मिस वर्ल्ड बनण्यापूर्वी प्रियंका करायची हे काम...
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने भारताबरोबच परदेशातही एक सेलिब्रेटी म्हणून नाव कमावले आहे.
मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने भारताबरोबच परदेशातही एक सेलिब्रेटी म्हणून नाव कमावले आहे. सध्या ती अमेरिकन टी.व्ही. शो क्वांटिको च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा झेंडा फडकवणाऱ्या प्रियंकाचा इतपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. अनेक अडचणींवर मात करत, खचून न जाता, हिंमत न हरता सातत्याने घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. सुपरहिट, मॉडेल, अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड प्रियंका चोप्राचे देश-विदेशात लाखो फॅन्स असतील. मात्र तिच्या चाहत्यांना तिच्याबद्दलची ही गोष्ट नक्कीच ठाऊक नसेल. कारण सर्वांना आर्श्चयाचा धक्का देणाऱ्या या गोष्टीचा खुलासा प्रियंकाने आताच केला आहे.
खुद्द प्रियंकाने केला खुलासा
प्रियंकाने आपल्या करिअरची सुरुवात मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतरच केली. हा किताब पटकवल्यानंतर २००२ मध्ये आलेल्या तामिळ सिनेमा थामिजान मध्ये तिने काम केले. पण तुम्हाला हे ऐकून आर्श्चय वाटेल की, प्रियंकाचा पहिला जॉब बर्फ खोदण्याचा होता. याचा खुलासा खुद्द प्रियंकाने केला आहे. अलिकडेच युएस मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत प्रियंकाने म्हटले आहे की, माझी पहिली नोकरी बर्फ खोदण्याची होती. त्याचबरोबर ती म्हणाली की, टी.व्ही. शो असो किंवा सिनेमा ती स्वतःचे स्टंट स्वतःच करते.
लवकरच बॉलिवूडमध्ये परतणार
अमेरिकेत आपल्या शो मध्ये व्यस्त असलेली प्रियंका दोन वर्षांनंतर सलमान खानसोबत भारत सिनेमातून बॉलिवूडमध्ये परतणार आहे. या सिनेमातून प्रियंका-सलमान ही जोडी सुमारे १० वर्षांनंतर समोर येईल. यापूर्वी २००८ मध्ये आलेल्या गॉड तुस्सी ग्रेट हो मध्ये दोघे झळकले होते.