Priyanka Chopra Necklace : बॉलिवूड अभिनेता प्रियांका चोप्रा ही सध्या भारतात असून काही कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी आलेली आहे. काल म्हणजे शुक्रवारी 15 मार्च रोजी प्रियांकानं मुंबईत बुलगारी स्टोअरच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्याचं कारण म्हणजे प्रियांका ही या ज्वेलरी ब्रॅंडची ब्रॅंड एम्बॅसिडर आहे. या दरम्यान, प्रियांकानं परिधान केलेल्या कपड्यांनी आणि नेकपीसनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्याशिवाय प्रियांकानं ईशा अंबानीच्या होळी पार्टीत देखील हजेरी लावली होती. त्यावेळी देखील प्रियांकानं तिच्या स्टाईलनं सगळ्यांचे लक्ष वेधले. मात्र, ज्या गोष्टीनं सगळ्यांचे लक्ष वेधले तो प्रियांकानं घातलेल्या नेकपीसनं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुलगारी स्टोअरच्या कार्यक्रमाला प्रियांकानं जो नेकपिस परिधान केला होता. त्या नेकपिसची किंमत ही 58.65 लाख आहे. तर ईशा अंबानीच्या होळी कार्यक्रमात प्रियांकाच्या गळ्यात जो नेकपिस दिसला. त्याची किंमत ही 8 कोटी आहे. अर्थाच त्याची किंमत ही 8,33,80,000 आहे. या हारमध्ये हीरे आणि हिरव्या टूमलाइन त्याशिवाय अनेक मोठे काबोचोन खडे लावण्यात आले आहेत. तर यावेळी प्रियांकानं गुलाबी रंगाची हाय स्लीट सारी नेसली होती. तर त्याच रंगाचं डिपनेक लाइन असलेलं ब्लाउज तिनं परिधान केलं होतं. खरंतर ही फक्त ईशा अंबानीची होळी पार्टी नव्हती तर त्यासोबत बुल्गारी रोमन होळी होती. तर प्रियांका मुंबईत तिची लेक मालती मेरी चोप्रा जोनससोबत आली आहे. 



दरम्यान, प्रियांका या आधी मेट गाला 2023 मध्ये घातलेल्या एका नेकलेसमुळे चर्चेत आली होती. जिथे तिनं 1 किंवा 2 नाही तर तब्बल 205 कोटींचा बुलगारी नेकलेस घातला होता. तो बुलगारी हार हा 11.3 कॅरेट हिऱ्यांपासून बनवण्यात आला होता. मार्केट रिपोर्ट्सनुसार, मेट गाला कार्यक्रमात प्रियांकानं घातलेल्या हारचा लिलाव करण्यात येणार होता. प्रियांका चोप्रा ही नेहमीच तिच्या स्टाईलमुळे ओळखली जाते. 



हेही वाचा : 'अ‍ॅनिमल' हिट झाल्यानंतर दुप्पट झालं तृप्ती डिमरीचं मानधन! 'भूलभुलैया 3' साठी अभिनेत्रीनं घेतली इतकी रक्कम


प्रियांकाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती लवकरच जॉन सीना आणि इदरीस एल्बा स्टारर हेड्स ऑफ स्टेटमध्ये दिसणार आहे. तर या आधी प्रियांका सिटाडेल आणि लव्ह अगेन या चित्रपटात दिसली होती. तर प्रियांकाला पहिल्यांदा सिटाडेल या वेब सीरिजमध्ये अभिनेत्याच्या बरोबरीनं मानधन मिळालं होतं.