`देसी गर्ल`ची `नेटफ्लिक्स`वर एन्ट्री; या दिवशी प्रदर्शित होणार `इजन्ट इट रोमॅन्टिक`
`नेटफ्लिक्स`वर प्रदर्शित होणार प्रियंका चोप्राचा `इजन्ट इट रोमॅन्टिक`
मुंबई : बॉलिवूड देसी गर्ल प्रियंका चोप्रा गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत आहे. परंतु आता देसी गर्ल तिच्या आगामी हॉलिवूड चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रियंका चोप्रा सध्या हॉलीवूडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवतेय. प्रियांका सध्या बॉलिवूडमध्ये नाही तर हॉलिवूडमध्ये सक्रिय झालेली दिसतेय. देसी गर्ल विदेशी चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियंका चोप्राचा हॉलिवूड चित्रपट 'इजन्ट इट रोमॅन्टिक' प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. परंतु हा चित्रपट भारतात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार नसून तो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा प्रीमियर येत्या २८ फेब्रुवारी रोजी भारतात होणार आहे. या रोमॅन्टिक कॉमेडीमध्ये प्रियंकाव्यतिरिक्त रेबेल विल्सन, लिएम हॅम्सवर्थ आणि एडम डिवाइन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
'इजन्ट इट रोमॅन्टिक' न्यूयॉर्कमधील एका आर्किटेक्टची गोष्ट आहे. आपलं काम लोकांसमोर आणण्यासाठी ती खूप मेहनत करत असते. प्रियंका चित्रपटात योग राजगुरूची भूमिका साकारणार आहे. प्रियंका सध्या या चित्रपटच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुसतंच 'द एलेन डीजेनेरेस शो'च्या सेटवर प्रियंका आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली होती. त्यावेळी तिने हा चित्रपट करतानाचा अनुभव अतिशय मजेशीर असल्याचं सांगितलं. या चित्रपटाची कथा अतिशय सुंदर असून काम करतानाचा अनुभवही सुंदर असल्याचं प्रियंकाने सांगितलं.
बॉलीवूडम अभिनेत्री 'इजन्ट इट रोमॅन्टिक' या चित्रपटाआधीही प्रियंकाने हॉलिवूड चित्रपटात आपला ठसा उमटवला आहे. 'अ किड लाईक जॅक', 'बेवॉच', हॉलिवूड टीव्ही शो 'क्वांटिको' यांमधून तिने हॉलिवूडमध्येही काम केले आहे. हॉलिवूड चित्रपटांतून प्रियंकाने केलेला अभिनय तसंच तिच्या भूमिकांनाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.