मुंबई : शुभ मंगल सावधान हा चित्रपट दिल्ली बेस्ड मुदित शर्माची कथा आहे, ज्याचं दिल्लीतील सुगंधासोबत लग्न होतं. जेव्हा मुदित आणि सुगंधा एंगेजमेंट आणि लग्नाच्या दरम्यान एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा त्यांना कळतं की मुदितला लैंगिक समस्या आहेत. हे कळताच सुगंधाचे आई-वडील लग्नाला विरोध करतात. पण मुदितला कोणत्याही किंमतीत सुगंधासोबत लग्न करायचं असतं  आणि त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न तो करतो. सुगंधाही यात त्याला पूर्ण पाठिंबा देते. मजेदार घटना आणि सर्व भांडणांमध्ये मुदित आणि सुगंधा शेवटी कसे लग्न करतात हे आपण या सिनेमातून पाहिलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शन निर्मित "शुभ मंगल सावधान" या रोमँटिक कॉमेडीच्या रिलीजला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. 1 सप्टेंबर 2017 रोजी रिलीज झालेला हा चित्रपट आर.एस. प्रसन्ना यांनी दिग्दर्शित केला असून त्यात आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. 


या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं नाही तर सोबतीने चित्रपटाच्या उत्तम कथेने प्रेक्षकांना उत्तम सिनेमा दिला. "शुभ मंगल सावधान"ने इरेक्टाइल डिसफंक्शनचा विषय धैर्याने हाताळला. हा चित्रपट निर्भयपणे प्रेमात असलेल्या तरुण जोडप्याची गोष्ट सांगतो. अशा विषयाला विनोदी सहानुभूतीपूर्वक हाताळण्याचे राय यांची कला नक्कीच उल्लेखनीय आहे. 


चित्रपटाचे यश आनंद एल राय यांच्या कथाकथनाच्या वेगळ्या दृष्टीकोनाचा आणि विचारशील कथनांसह मनोरंजनाची सांगड घालण्याच्य बेस्ट उदाहरण होता. या सिनेमॅटिक चित्रपटाचा सहा वर्षांचाप्रवास सुरू असताना साजरा करत असताना रायच्या कलर यलो प्रॉडक्शनचे झिम्मा 2, फिर आयी हसीन दिलरुबा आणि तेरे इश्क में यासह अनेक अफलातून प्रकल्प लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.


या चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांची धमाल केमिस्ट्री या चित्रपटाद्वारे पडद्यावर पाहायला मिळाली होती.  हा सिनेमा आनंद एल राय यांच्या कलर येलो प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. या सिनेमाला आज ६ वर्ष पुर्ण झाली आहेत. अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि आयुष्यमान खुराना यांनी त्यांच्या इन्स्टग्रामवर या निमीत्त काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.