`लाइगर` फ्लॉप झाल्यानंतर निर्माती चार्मी कौरचा मोठा निर्णय...
रिलीजपूर्वी साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे यांच्या `लाइगर` या चित्रपटाची जोरदार चर्चा होती.
मुंबई : रिलीजपूर्वी साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे यांच्या 'लाइगर' या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. या चित्रपटाची लोकांमध्ये प्रचंड क्रेझ होती.
त्याचवेळी, लोकांना हा चित्रपट खूप आवडेल आणि बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र जेव्हा हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा नेमकं उलट घडलं आणि लाइगर त्याच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. दरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियापासून ब्रेक घेतला आहे.
'जगा आणि जगू द्या'...
लाइगरच्या निर्मात्या चार्मी कौर यांनी 4 सप्टेंबर रोजी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली. ज्यात ती काही काळासाठी सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याची माहिती दिली. तिने लिहिलं की, "शांत व्हा मित्रांनो, सोशल मीडियापासून ब्रेक घेत आहे. पुन्हा बाउन्स करेन, तोपर्यंत जगा आणि जगू.''
मात्र, नुकतंच तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ती 2019 मध्येच करण जोहरला लाइगरच्या संदर्भात भेटली होती आणि त्याचं शूटिंग 2020 मध्ये सुरू झालं होतं. तिने पुढे सांगितलं की लाइगर अधिक चांगली कामगिरी करेल अशी तिला आशा होती.
'लाइगर'ने आतापर्यंत अनेक कोटींची कमाई केली आहे
वृत्तानुसार, विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या 'लाइगर' या चित्रपटाने आतापर्यंत केवळ 18 कोटींची कमाई हिंदी आवृत्तीतून केली आहे. त्याचबरोबर दक्षिणेतही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर काही विशेष जादू करू शकला नाही. या चित्रपटाने आतापर्यंत भारतात सर्व भाषांतून केवळ ४१ कोटी रुपयांची कमाई केली आहे.