मुंबई : मालिका आणि चित्रपटांच्या विश्वात भारतामध्ये काही निर्मिती संस्थांना मानाचं स्थान आहे. बरेच कलाकार घडवण्याचं काम या निर्मिती संस्थांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यातलंच एक नाव म्हणजे 'बालाजी टेलिफिल्म्स'. अभिनेते जितेंद्र यांच्या लेकिनं स्वबळावर या निर्मितीसंस्थेला मोठं केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकता कपूर हिनं जीवनातील बराच काळ तिच्या कामाला वाहिला. निर्मिती संस्थेला मोठं केलं, बरेच कलाकार घडवले. पण, वयाच्या 47 व्या वर्षीही एकता मात्र तिच्या खागसी आयुष्यात मात्र एकटीच राहिली. (producer ekta kapoor did not marry because of her father jeetendra read details)


आजपर्यंत तिनं लग्न केलेलं नाही. एकताच्या यशाची चर्चा होते, तिच्या मानधनाची चर्चा होते तिच्या कामाचीही बरीच चर्चा होते. पण, तिनं लग्न का केलं नाही याची मात्र फार क्वचितच चर्चा होताना दिसते. 


तिनं लग्न न करण्यामागे एक मोठं कारण आहे. या कारणाचा तिच्या वडिलांशी म्हणजेच अभिनेते जितेंद्र यांच्याशी थेट संबंध आहे. एका मुलाखतीमध्ये खुद्द एकतानंच या गोष्टीचा गौप्यस्फोट केला होता. 


एकता साधारण 15 वर्षांची असताना तिला तिच्या वडिलांनी हातखर्चासाठी पैसे दिले. पण, त्याव्यतिरिक्त पैसे देण्यास मात्र त्यांनी नकार दिला होता. एके दिवशी एकतानं जितेंद्र यांच्याकडे लग्नाविषयी तिच्या मनात असणारं वेड व्यक्त केलं. लेकिचं बोलणं ऐकून जितेंद्र जे काही म्हणाले त्याचा एकतावर मोठा परिणाम झाला. 


'एकतर तू लग्न कर, किंवा मग हे पार्टी वगैरे करण्यापेक्षा काम कर जी माझी इच्छा आहे', असं जितेंद्र एकताला म्हणाले. वडिलांचे हे शब्द तिच्यासाठी त्या क्षणापासून काळ्या दगडावरची पांढरी रेघ ठरले. 


लग्नापुढे एकतानं करिअरची निवड केली. मन लावून समर्पकतेनं काम केलं. जिद्दीच्या बळावर ती हिंदी कलाविश्वातील आघाडीची निर्माची ठरली. आपल्याला विचारही करता येणार नाही, इतका मोठा निर्णय एकतानं घेतला आणि तो बदलू दिला नाही.