मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वासह, चाहत्यांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे. सुशांतने आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं. मात्र यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सुशांतच्या निधानानंतर चित्रपट निर्माते मुकेश भट्ट यांनी धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. हे असं काही तरी होईल, याची मला आधीच कल्पना होती. सुशांत आधीपासूनच डिस्टर्ब होता, असं मुकेश भट्ट म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत मुकेश भट्ट यांनी सांगितलं की, 'सुशांत आणि मी 'आशिकी 2' आणि 'सडक 2' या दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम करण्याबाबत बोलण्यासाठी जवळपास दीड वर्षांपूर्वी भेटलो होतो. त्यावेळी त्याच्याशी बोलताना, त्याच्यासोबत काहीतरी चुकीचं होत असल्याची जाणीव झाली होती.'


'चित्रपटाविषयी बोलताना सुशांत खूप डिस्टर्ब वाटत होता. माझ्याशी बोलताना तो मनाने माझ्यासोबत नव्हता. त्याचवेळी त्याच्यासोबत काही चुकीचं घडत असल्याची जाणीव मला झाली,' असं भट्ट म्हणाले.


बॉलिवूडमध्ये सुशांतने केला होता प्रचंड स्ट्रगल; पहिली कमाई अवघी २५० रुपये


भट्ट यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला स्किझोफ्रेनियाग्रस्त schizophrenia असलेल्या अभिनेत्री परवीन बाबींसोबत काम केलं होतं. सुशांतशी बोलताना, तो परवीन बाबी यांच्या मार्गावर जात असल्याची भीती आपल्याला वाटल्याचं, मुकेश भट्ट यांनी सांगितलं.


सुशांत सिंह राजपूतचे ७ बेस्ट मुव्ही डायलॉग्ज


मुकेश भट्ट यांनी सांगितलं की, सुशांतच्या मृत्यूची बातमी ऐकून धक्का बसला नाही, परंतु तो दु:खी आणि निराश असल्याचं ते म्हणाले. भट्ट यांनी स्पष्टीकरण दिलं की, त्यांना सुशांतच्या या स्थितीबाबत माहिती होती आणि तो आपल्या मित्रांद्वारे काही डॉक्टरांच्याही संपर्कात असल्याचं ते म्हणाले. मात्र मी स्वत: त्याच्याशी वैयक्तिकरित्या जवळ नसल्याचंही त्यांनी सांगितलं.


सुशांतच्या निधनाच्या बातमीनंतर वडिलांची तब्येत बिघडली