Kartik Aaryan : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा त्याच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट काल 29 जुन रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटानं पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली नसली तरी देखील निर्मात्यांना विकेंडमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तर चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगली प्रतिक्रिया मिळाली आहे. कार्तिक आणि कियाराची केमिस्ट्री प्रेक्षकांना दुसऱ्यांदा पडद्यावर पाहायला मिळाली. दरम्यान, कियारानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कार्तिक आर्यनविषयी एक मोठा खुलासा केला आहे. चित्रपट हिट झाल्यावर निर्माते कार्तिकला एक कार गिफ्ट करतात असं कियारानं सांगितलं तर त्यावर कार्तिकनं देखील प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्तिक आणि कियारा यांनी मिर्ची प्लसला नुकतीच एक मुलाखत दिली होती. यावेळी कियारानं कार्तिक आर्यनच्या टी-शर्टकडे इशारा केला. या टी-शर्टवर कारची एक प्रिंट होती. हे टी-शर्ट दाखवत कियारा म्हणाली की ही एक साइन आहे. कार्तिकनं हे टी-शर्ट परिधान करण्याचं  कारण,  जेव्हा पण कार्तिकचा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरतो तेव्हा निर्माते त्याला एक कार भेट करतात. त्यावर खोडकर अंदाजात उत्तर देत कार्तिक म्हणतो ते माझं नाव आहे. कार्तिक (Car-tik)



दरम्यान, या चित्रपटात कार्तिक, कियारा, सुप्रिया पाठक कपूर, गजराज राव, सिद्धार्थ रंधेरिया, अनुराधा पटेल, राजपाल यादव, निर्मित सावंत आणि शिखा तलसानिया यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळ्या समीर विद्वान्सनं केलं आहे