नवी दिल्ली : जयपूरला सलमानचा पुतळा जाळत, पोस्टर फाडले. 


सलमानविरुद्ध निदर्शनं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दबंग खान, सलमानचा बहुचर्चित चित्रपट, "टायगर झिंद है" आज प्रदर्शित झाला. मात्र तो लगेच वादाच्या भोवऱ्यात अडकलाय.
जयपूरमध्ये सलमानच्या विरोधात निदर्शनं केली जातायेत. जयपूरच्या ऐतिहासिक राजमंदिर सिनेमागृहाबाहेर पोस्टर फाडले गेले. त्याच्या विरोधात रॅली काढण्यात आली आहे.


वाल्मिकी समाजाची भूमिका


वाल्मिकी समाजाकडून हा विरोध आणि प्रदर्शनं केली जात आहेत. सलमानने या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळेस वाल्मिकी समाजाच्याबद्दल जातीवाचक आणि अपमानजनक शब्द वापरल्याचा आरोप केला जातोय.


जातीवाचक शब्द वापरले


सलमान खान आणि शिल्पा शेट्टी यांच्याविरुद्ध एफआय़आरसुद्धा नोंदण्यात आली आहे. शिल्पाच्या सुपर डान्स या शोमध्ये सलमानने जातीवाचक शब्द वापरले होते. यामुळे वाल्मिकी समाज दुखावला गेला आहे. यामुळेच सलमान आणि शिल्पा यांच्याविरुद्ध वातावरण चांगलच तापलं आहे.