Pulkit Samrat And Kriti Kharbanda Wedding : बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांच्या लग्नाची काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर आता ते दोघं लग्न बंधनात अडकले आहेत. त्या दोघांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांचे हे फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना फार आनंद झाला आहे. इतकंच नाही तर सगळीकडे त्या दोघांचेच फोटो पाहायला मिळत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिती खरबंदानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या लग्नातील हे फोटो शेअर केले आहेत. दोघेही फार सुंदर दिसत आहेत. क्रितीनं गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. तर पुलकितची शेरवानी ही पिस्ता रंगाची आहे. एका फोटोत तुम्ही पाहु शकता की दोघं हाथ पकडून चालत आहेत. तर दुसऱ्या फोटोत पुलकितनं क्रितीला मिठी मारली असून क्रिती त्याला किस करत आहे. तिसऱ्या फोटोत पुलकित क्रितीच्या गळ्यात मंळसुत्र घातल्याचं दिसत आहे. तर चौथ्या फोटोत त्या दोघांच्या पाठून फोटो काढला असून लग्नात आलेले पाहुणे हे त्यांच्यावर फुलं घालताना दिसत आहेत. दोघांनी दिल्लीच्या एनसीआरमध्ये लग्न केलं. तर 14 मार्च रोजी त्यांच्या संगीत आणि मेहंदीचा कार्यक्रम झाला. तर काल 15 मार्च रोजी लग्न केलं. 



हे फोटो शेअर करत क्रितीनं कॅप्शन दिलं आहे की "गडद निळ्या आकाशातील सकाळच्या कोवळ्या उन्हाची किरणांपर्यंत. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चढ-उतारावार कायम तुझ्यासोबत राहणार. सुरुवातीपासून शेवटपर्यंत, प्रत्येकवेळी, जेव्हा माझ्या हृदयात धडधड होतं ते फक्त तुझ्यासाठी होतं." 


पुलकित आणि क्रितीची लव्ह स्टोरी!


पुलकित आणि क्रितीच्या लव्ह स्टोरी विषयी बोलायचे झाले तर 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या पागलपंतीच्या सेटवर त्यांची भेट झाली होती. दोघांमध्ये सुरुवातीला मैत्री झाली. मग मैत्रिचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. दोघांनी सुरुवातीला डेटिंगच्या चर्चांवर काही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, मग दोघांनी ऑफिशिअली त्यांच्या नात्याची कबूली दिली. यानंतर सोशल मीडियावर त्या दोघांनी ओपनली त्यांच्या नात्यावर वक्तव्य केलं आहे. 


हेही वाचा : जगाला अमेरिका नाही भारत वाचवेल! अक्षय कुमारचं विधान चर्चेत; एलियन्सचाही उल्लेख


पुलकित आणि क्रितीचे चित्रपट


पुलकित आणि क्रिती यांनी एकत्र वीरे की वेडिंग, तैष आणि पागलपंती या चित्रपटात काम केलं आहे.