नागराजच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणाला ब्रेक
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आगामी सिनेमाचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असणारं चित्रीकरण ताबडतोब थांबावं, अशी सूचना विद्यापीठानं केलीय.
पुणे : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आगामी सिनेमाचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असणारं चित्रीकरण ताबडतोब थांबावं, अशी सूचना विद्यापीठानं केलीय.
या चित्रीकरणासाठी पुणे विद्यापीठात सेट उभारण्यात आला होता... तो काढण्याचं पत्र पुढच्या आठ दिवसांत नागराज मंजुळेंना देण्यात येणार आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांनी ही माहिती दिलीय. या सेटसाठी दिलेली मुदत आधीच संपलीय, तरीही विद्यापीठात चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे.