मुंबई : संगीत विश्वातून दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध सिंगरचे निधन झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संगीत विश्वात शोककळा पसरली आहे. या प्रसिद्ध सिंगरच्या निधनानंतर आता मनोरंजन, सामाजिक आणि राजकिय विश्वातून श्रद्धांजली व्यक्त करण्यात येत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसिद्ध सिंगर सिद्धू मुसेवाला याच्या हत्या प्रकरणाने संगीत विश्वात पोकळी निर्माण झाली असतानाच आता आणखीण एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध पंजाबी सिंगर निर्वैर सिंग याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या घटनेने संगीत विश्वात शोककळा पसरलीय. 


मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबी गायक निर्वैर सिंग याचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडलीय. मंगळवारी ऑस्ट्रेलियात दुपारी 3.30 च्या सुमारास बुल्ला-डिगर्स रेस्ट रोडवर डिगर्स रेस्टमध्ये तीन वाहनांमध्ये जोरदार टक्कर झाली. या अपघातात निर्वैर सिंग यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. हे संपूर्ण प्रकरण चुकीच्या पद्धतीने गाडी चालवण्याचं असल्याचं सांगण्यात येत आहे.


गायकाची पोस्ट
पंजाबी गायक गगन कोकरी यांनीही गायक निर्वैर सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे.गगन कोकरी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, 'या धक्कादायक बातमीने माझी सकाळ झाली. मी आणि निर्वैर दोघांनी मिळून टॅक्सी चालवली होती. आम्ही दोघांनी पहिल्यांदा एकत्र गाणं गायलं. मग तुम्ही कामात व्यस्त झालात. तुमचे 'तेरे बिना' हे गाणे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट गाणे ठरले आहे. तू खूप छान माणूस होतास. मी तुला कधीच विसरू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.  


निर्वैर सिंग हे गायनात करिअर करण्यासाठी 9 वर्षांपूर्वी पत्नी आणि मुलांसह ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाले होते. निर्वैर सिंग यांनी 
हिक्क टोक के, तेरे बिना, फेरारी ड्रीम, अधूरा, दर्द ए दिल आणि इतर अनेक हिट गाणी गायली आहेत.  


दरम्यान प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला यांच्यानंतर आता आणखी एका पंजाबी गायकाचा मृत्यू झाल्याने संगीत विश्वात शोककळा पसरलीय. निर्वैर सिंग यांना मनोरंजन, सामाजिक आणि राजकिय विश्वातून श्रद्धांजली व्यक्त करण्यात येत आहे.