Pushkar Jog Injured On Set : मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता पुष्कर जोग हा घराघरात पोहोचला. तो अशा अभिनेत्यांपैकी आहे ज्यानं फक्त मराठी नाही तर हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. पुष्कर जोगनं आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत. आता तो फक्त एक अभिनेता नसून दिग्दर्शक सुद्धा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून पुष्कर एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा 'धर्मा- दि एआय स्टोरी' घेऊन येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, पुष्करला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित या चित्रपटाचं स्कॅाटलॅंडमध्ये चित्रीकरण सुरु असताना ॲक्शन सीन करताना झालेल्या अपघातात पुष्कर जोग याला गंभीर दुखापत झाली. या अपघातात त्याच्या गुडघ्याला आणि हाताला जबर मार बसला आहे. दरम्यान, पुष्कर जोग मुंबईत दाखल झाला आहे आणि लवकरच तो चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. याविषयी त्यानं इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक पोस्ट देखील शेअर केली होती. यावेळी त्यानं लिहिलं की 'काल शूटिंग करत असताना माझ्या हाताला आणि गुडघ्याला दुखापत झाली आहे. खूप त्रास होतोय... कठीण दिवस होता.'  




चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणाला ती, "मराठी मनोरंजन विश्वात हा प्रयोग पहिल्यादांच होत आहे. या चित्रपटाचा विषय नवीन असून यामध्ये तुम्हाला अनेक नवीन गोष्टी दिसतील. हा विषय एआयवर आधारित आहे. कसा एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून वैयक्तिक सूड उगवण्याचा प्रयत्न करत एका निष्ठावंत बापाच्या मुलीचे अपहरण केले जाते. आपल्या मुलीला पुन्हा जिवंत पाहाण्यासाठी धर्म मुक्तीच्या धोकादायक प्रवासाला निघालेल्या या बापाची कहाणी यात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात सुरू झाली असून सप्टेंबर महिन्यात ही फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येईल.''


हेही वाचा : 'ओंकार भोजनेला पण साडी नेसायला लावली...', प्रोमो पाहताच नेटकऱ्यांनी केलं निलेश साबळेला ट्रोल


दरम्यान, आतापर्यंत आपण एआय टेक्नॉलॉजी आपण फक्त सोशल मीडिया आणि इतर वेगवेगळ्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर पाहिली होती. आता हाच विषय थेट आपल्याला मराठी चित्रपटात पाहायला मिळणार असल्यानं 'धर्मा- दि एआय स्टोरी' विषयीची उत्सुकता आता वाढलेली दिसत आहे. पुष्कर जोग हा नेहमीच मराठी चित्रपटसृष्टीला नेहमीच हटके विषय देताना दिसतो आहे. त्यांचा प्रत्येक चित्रपट हा नाविन्यपूर्ण असतो, त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी भन्नाट पाहायला मिळेल. या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत. तर पुष्कर सुरेखा जोग, दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.