Pushpa 2 Item Song : अल्लु अर्जुनसोबत श्रीलीला पाहताच संतापले नेटकरी, समांथाचा उल्लेख करत म्हणाले...
Pushpa 2 Item Song : `पुष्पा 2` मधील या गाण्यानं लावलं सगळ्यांना वेड.. तर काहींना आली समांथाची आठवण...
Pushpa 2 : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा 'पुष्पा 2' हा चित्रपट गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. काही दिवसातच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच पटनामध्ये चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. आता सगळीकचे या चित्रपटातील 'किसिक' या गाण्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे प्रेक्षकांमधील उत्सुकता देखील वाढली आहे.
प्रेक्षकांमध्ये असलेली उत्सुकता आणि चित्रपटाची प्रतीक्षा करत असताना आता या चित्रपटातील 'किसिक' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. अल्लू अर्जुन आणि श्रीलीला यांच्या जोडीच्या या गाण्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. श्रीलीलानं तिच्या डान्सनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. तर नेहमीप्रमाणे अल्लू अर्जुनची हाय एनर्जी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. चाहत्यांचं म्हणणं आहे की हे गाणं आता समांथा रुथ प्रभूच्या 'ऊ अंटावा' या गाण्याला मागे टाकणार आहे. हे गाणं सुपरहिट झालं आहे. हेच कारण आहे की चाहत्यांना चित्रपटातील आयटम सॉन्गची आतुरतेनं प्रतीक्षा होती.
अल्लू अर्जुननं गाण्याची एक झलक तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'गाण्याची काय बीट आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'पुष्पा 2 सुपरहिट.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'वाईल्ड फायर.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'प्रतीक्षा करु शकत नाही.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'उत्सुकता आणखी वाढली.' तर काही नेटकऱ्यांनी म्हटलं की 'श्रीलीलाच्या जागी समांथालाच घ्यायला हवं होतं. किंवा समांथाची जागा कोणी घेऊ शकत नाही.'
हेही वाचा : 'कोण किशोर कुमार?' आलिया भट्टच्या प्रश्नानं रणबीरला बसला धक्का; स्वत: खुलासा करत म्हणाला...
दरम्यान, 5 डिसेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'पुष्पा 2: द रूल' चं दिग्दर्शन लोकप्रिय दिग्दर्शक सुकुमार यांनी केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती ही माइथ्री मूवी मेकर्सनं सुकुमार राइटिंग्ससोबत मिळून केली आहे. चित्रपटाला म्यूजिक टी-सीरिजनं केलं आहे. या चित्रपटात फहाद फासिल, जगपति बाबू, धनंजय, राव रमेश, सुनील आणि अनुसूया भारद्वाज देखील आहेत. या चित्रपटाचा पहिला भाग हा 2021 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफसवर बक्कळ कमाई केली होती.