Pushpa 2 Twitter Review : 'पुष्पा 2' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सगळ्यांना याविषयी उत्सुका लागली होती. तर आज 5 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 3 तास 20 मिनटांचा हा चित्रपट आहे. तर या चित्रपटात चंदनच्या लाकडांची स्मगलिंग करताना दिसला आणि आज हा सगळ्यात मोठा स्मगलर ठरला आहे. या सगळ्यात त्याचे खूप शत्रू होतात आणि त्यापैकी एक म्हणजे एसपी भंवर सिंग. आज प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर नेटकरी यावर काय प्रतिक्रिया देत आहेत, ते जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेटकऱ्यांनी आधीचा ट्विटर आणि आताच्या X अकाऊंटवरून अशी प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी चित्रपटातील एक सीन शेअर करत म्हणाला, 'हा चित्रपट पुन्हा एकदा नक्कीच पाहू शकतो. नुकताच हा चित्रपट पाहिला. किती सुंदर चित्रपट बनवला आहे. अल्लू अर्जुनला नॅशनल अवॉर्ड मिळायला हवा. या वर्षात जर कोणता चित्रपट थिएटरमध्ये पाहू शकतो तर तो हाच आहे.' एका नेटकऱ्यानं फर्ट्स हाफ पाहून रिव्ह्यू दिला आहे. 'पहिला भाग पाहिला. खूप सुंदर आहे. पुष्पाच्या इंट्रो सीनमध्ये जपानच्या पोर्टवर झाला आहे किंवा इंटर्व्हलमध्ये तो शिखावतच्या समोर येतो. दोन्ही गाणी सुंदर आहेत. गाणी ऐकायला मज्जा आली आणि तितिकीच मज्जा स्क्रिनवर पाहायला मिळाली. खूप सुंदर चित्रपट आहे नक्की पाहा.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'हा सीन आणि अल्लू अर्जुनचा चित्रपटातील अभिनय हा अप्रतिम आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'सिनेमेटोग्राफी आणि म्युजिक दोन्ही नेक्ट्स लेव्हलवर आहे. सुकुमारनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय. हा एक मास चित्रपट आहे.'






'पुष्पा 2' हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा' चा दुसरा भाग आहे. तेव्हा या चित्रपटानं देखील बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. त्याला एक जबरस्त रिस्पॉन्स मिळाला होता. इतकंच नाही तर अल्लू अर्जुनला पुष्पराजच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचा नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. या चित्रपटातून पुन्हा एकदा अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.