अल्लू अर्जुनच्या वडिलांनी केलेला `तो` भीमपराक्रम, जाणून बसेल धक्का
त्यांनी असं काय केलं की होतेय चर्चा... ?
मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन यानं 'पुष्पा' या चित्रपटाच्या निमित्तानं संपूर्ण चित्रपट वर्तुळाचत लोकप्रियता मिळवली. इथं मुख्य मुद्दा असा, की अल्लू अर्जुन यानं यापूर्वीही साकारलेल्या चित्रपटांना घवघवीत यश मिळालं आहे. आता मुद्दा असा, की अल्लू अर्जुनची चर्चा होत असताना अल्लू अरविंद यांचं नाहवी समोर येत आहे. (Allu Arjun Pushpa)
अल्लू अरविंद म्हणजे अल्लू अर्जुनचे बाबा. अनेक वर्षांपासून अल्लू अर्जुनचे वडिलही या कलाजगतामध्ये सक्रिय आहेत.
त्यांची कामगिरी खुद्द अल्लू अर्जुनलाही लाजवणारी. तुम्हाला ठाऊक आहे का, ते अल्लू अरविंद (Allu Aravind)च होते ज्यांनी बॉलिवूडला 'गजनी' या चित्रपटाच्या रुपात 100 कोटींची कमाई करणारा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट दिला होता.
2005 मधील तामिळ हिट रिमेक असणाऱ्या 'गजनी'चं दिग्दर्शन ए.आर. मुरुगादॉस यांनी केलं होतं. अभिनेता आमिर खान आणि असिन यांच्या यामध्ये मध्यवर्ती भूमिका होत्या.
चित्रपटाची निर्मिती अल्लू अरविंद यांनी केली होती. हिंदी चित्रपटसृष्टीत निर्मिती करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती.
'गजनी'च्या यशापासून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये 100 कोटींची कमाई करणारा चित्रपट म्हणजे ब्लॉकबस्टर असं प्रमाण मानलं गेलं.
गजनीव्यतिरिक्त अल्लू अरविंद यांनी प्रतिभा, द जेंटलमेन, कौन?, कुंवारा, कलकत्ता मेल अशा बॉलिवूड चित्रपटांचीही निर्मिती केली. त्यांचा आगामी चित्रपट आतापासूनच चर्चेच आहे.
अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या 'जर्सी' या चित्रपटाचीही त्यांनी निर्मिती केली आहे.