मुंबई : वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी अभिनेत्री रश्मिका मंदाना हिनं देशातील प्रत्येक चाहत्याच्या मनात स्थान मिळवलं. अतिशय कमी वेळातच ती नॅशनल क्रश म्हणून ओळखली गेली. इंग्लिश लिटरेचर, पत्रकारिता यातून तिनं शिक्षण मिळवलं आणि अभिनयात करिअर निवडलं. (Rashmika Mandanna)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2016 पासून रश्मिकानं तिच्या करिअरची सुरुवात केली. सध्याच्या घडीला ती सर्वाधिक मानधन घेणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रींच्या यादीत अग्रस्थानी आहे. 


रश्मिका हल्लीच प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा' या चित्रपटातून 'श्रीवल्ली'च्या रुपात सर्वांसमोर आली आणि पाहता पाहता तिच्यावर सर्वांनीच जीव ओवाळून टाकला. 


आता तिची खरी परीक्षा होती. कारण, चित्रपट प्रदर्शित झाला खरा. पण, त्यामध्ये तिचा आणि अभिनेता अल्लू अर्जून याचा एक इंटिमेट सीन होता. 


हा सीन सुरुवातीला चित्रपट पाहणाऱ्यांना इतका खटकला की, तो हटवण्याची मागणी जोर धरू लागली. 



पुष्पा श्रीवल्लीच्या छातीला स्पर्श करतो असं त्या दृश्य़ात दाखवण्यात आलं होतं. पण, हे प्रेक्षकांना काही रुटलं नाही. अखेर या दृश्याला वगळण्याचा निर्णय़ निर्मात्यांनी घेतला आणि त्यानंतर पुन्हा नव्यानं कट लागलेला हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता आला. 


तिथं रश्मिकाची कारकिर्द या न त्या कारणाने प्रसिद्धीझोतात आली. सोबतच तिच्या खासगी आयुष्याच्याही चर्चा झाल्या. 


अभिनेतार रक्षित शेट्टी याच्याशी तिनं 2017मध्ये साखरपुडाही केा होता. पण, हे नातं फार काळ टिकलं नाही. सध्या रश्मिकाचं नाव अभिनेता विजय देवेरकोंडा याच्याशी जोडलं जात आहे. 



दाक्षिणात्य कला विश्वात कमाल लोकप्रिय असणाऱ्या या जोडीनं खरोखरंच लग्न केल्यास चाहत्यांसाठी ही परवणी असेल यात शंका नाही.