Actress Controversy: 'पुष्मा' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या दोन अभिनेत्रींनी चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. परंतू आता 'पुष्मा' फेम दोन्ही अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. अभिनेत्री रश्मिका मंदानाने (rashmika mandana) श्रीवल्ली म्हणून चाहत्यांचं मनोरंजन केलं, तर अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या (samantha ruth prabhu) आयटम गाण्याने सर्वांना थिरकण्यास भाग पाडलं. पण 'पुष्पा' सिनेमाच्या यशानंतर दोघींच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रश्मिकाला चाहत्यांचा विरोध 
एका मुलाखतीमुळे रश्मिका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मुलाखतीत रश्मिकाने तिच्या अभिनयाच्या प्रवासाबाबत सांगितलं. रश्मिकाला ब्रेक कसा मिळाला याबद्दल देखील विचारण्यात आलं. यावेळी रश्मिकाने तिला ब्रेक दिलेल्या परमवह स्टूडिओबद्दल सांगितलं.  याच प्रॉडक्शन हाऊसच्या किरिक पार्टी  सिनेमात रश्मिका Ex-Boyfriend आणि अभिनेता रक्षित शेट्टीसोबत झळकली होती.


मुलाखतीत रश्मिका म्हणाली, 'एका प्रॉडक्शन हाऊसमधून मला कॉल आला होता.' रश्मिकाच्या या वक्तव्यामुळे सिनेप्रेमी नाराज आहेत. रश्मिका तिच्या सुरुवातीच्या टप्प्याचं अपमान करत असल्याचा विरोधकांचा दावा आहे. 


फक्त चाहतेच नाहीतर, दिग्दर्शक-अभिनेता ऋषभ शेट्टीही रश्मिकावर संतापला आहे. भविष्यात कधीही रश्मिकासोबत काम करणार नसल्याचं त्याने सांगितलं आहे. रश्मिकाच्या वक्तव्यामुळे कन्नड थिएटर मालक आणि चित्रपट संघटना भविष्यात रश्मिकाच्या सिनेमांवर बंदी घालू शकतात अशीही चर्चा आहे.


समंथा कायद्याच्या कचाट्यात 
नुकताच प्रदर्शित झालेल्या 'यशोदा' सिनेमामुळे समंथा (samantha ruth prabhu) कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे. हैदराबादच्या एका रुग्णालयाने समंथा आणि निर्मात्यांविरोधात मानगानीचा गुन्हा दाखल केला. आमच्या नावाचा गैरवापर केल्यामुळे आमच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचं रुग्णालयाचं म्हणणं आहे. हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्यामुळे सिनेमा ओटीटीवर 19 डिसेंबर पर्यंत  प्रकाशनाला स्थगिती देण्यात आली आहे. (samantha ruth prabhu news)