मुंबई : 'पुष्पा' या चित्रपटामुळे आणि त्याही आधापासूनच अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकवणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना ( Rashmika Mandanna) सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. भारतात एक्सप्रेशन्स क्वीन, अशीही तिची ओळख. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाक्षिणात्य कलाजगतामध्ये नावाजलेल्या रश्मिकानं म्हणे आता बॉलिवूडकरांवरही भुरळ घातली आहे.


'पुष्पा'मध्ये 'श्रीवल्ली'ची भूमिका साकारणाही आणि धमाकेदार असा 'सामी' डान्स करणारी रश्मिका सध्या देश सोडून गेली आहे. 


एकाएकी रश्मिकानं देश का सोडला, बरं तिथे जाऊन ती नेमकी काय करतेय असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांच्या मनात सध्या घर करत आहेत. 


मुळात रश्मिकाबद्दल चिंता करण्याचं काहीच कारण नाही. सध्या ती रशियामध्ये आहे. जिथून पहिल्याच दिवशी तिनं असा फोटो पोस्ट केला, जो पाहून भल्याभल्यांनी 'कित्ती गोड....' अशा प्रतिक्रिया दिल्या. 


रश्मिकानं पाऊट करतानाचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती हलक्या गुलाबी रंगाचं लोकरी जॅकेट घालून दिसत आहे. 


मोकळे केस, कमीत कमी मेकअप असाच तिचा लूक इथे पाहायला मिळत आहे. 



25 वर्षीय रश्मिकानं शेअर केलेल्या हा फोटो पाहून तिच्या सेलिब्रिटी मैत्रीणींनीही यावर कमेंट केली आहे. 


येत्या दिवसांत आता रशियातून ती नेमकी काय धमाल करते आणि कशी चाहत्यांना थक्क करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.