Pushpa 2 : 'पुष्पा' हा चित्रपट प्रदर्शित होऊन बराच काळ झाला असला तरी देखील हा चित्रपट आजही प्रेक्षकांना पाहायचा आहे. इतकंच काय तर प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत आहेत. फक्त चित्रपटातील सीन्स नाही तर चित्रपटातील डायलॉग्स देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. अल्लू अर्जुन आणि रश्मिका या दोघांचा हा चित्रपट चांगलाच गाजला होता. चित्रपटाचा दुसरा भाग पाहण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांना या चित्रपटातील भंवर सिंह शेखावत ही भूमिका साकारणारा अभिनेता फहद फासिल तर चांगलाच चर्चेत आहे. आता या चित्रपटातील त्याचा पहिला लूक समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्ट्सनुसार, फहद फासिलनं या चित्रपटात एका पोलिसाची भूमिका साकारली आहे. निर्मात्यांनी फहद फासिलसोबत शूटिंगचा एक पार्ट पूर्ण केला आहे. तर आता पुष्पाला हरवण्यासाठी भवर सिंह शेखावत पूर्ण तयारीत येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, दुसऱ्या भागात पुष्पा आणि भवर सिंह शेखावत या दोघांमध्ये खूप मोठी दंगल होणार असून त्यांच्यातील एक जबरदस्त अॅक्शन सीन पाहायला मिळणार आहे. या सगळ्याची सुरुवात ही अल्लू अर्जुननं भवर सिंह शेखावतला लग्नाच्या दिवशी जंगलात बॉक्सर्सवर सोडले होते. आता त्या अपमानाचा बदला भवर सिंह शेखावत कशा प्रकारे घेणार हे पाहण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक आहेत. चित्रपटातील भवर सिंगच्या भूमिकेच्या माध्यामातून पुष्पाच्या अडचणीत वाढ होणार आहे. आता त्या परिस्थितीत पुष्पा कसा सामना करणार ते पाहण्यासारखे असेल.



हेही वाचा : 'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्री लेस्बियन? मुलींबाबत जे काही म्हणालीये ते एकदा ऐकाच...


दरम्यान, फहद फासिलचा सेटवरचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोत तो शूट करत असल्याचे दिसत आहे. तर त्याचा हा फोटो शेअर करत Pushpa 2 The Rule या चित्रपटाचा एक महत्त्वाचं शेड्यूल्ड भवर सिंह शेखावतसोबत पूर्ण झालं आहे. यावेळी तो बदला घेण्यासाठी परतणार आहे. 'पुष्पा' या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. हा चित्रपट 2021 साली प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं बक्कळ कमाई केली होती. 'पुष्पा 2' साठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. ऑरमॅक्स रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' या चित्रपटासाठी उत्सुक असणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाची निर्मिती ही मॅथरी मूव्ही मेकर्सनं केलं आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.