मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या भूमिका असणाऱ्या आणि सहकलाकारांचा ताकदीचा अभिनय असणाऱ्या 'पुष्पा' (Pushpa) या चित्रपटाची लोकप्रियता अद्यापही कायम आहे. (Allu Arjun Rashmika Mandanna)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच दिवस उलटून गेले असते तरीही त्यातील डायलॉग्स, गाणी आणि पुष्पाची स्टाईल याचा कशाचाच प्रभाव कमी झालेला नाही. 


लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच स्वत:ला या चित्रपटाशी एकरुप करत असंख्य रील आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले. 


चित्रपटातील बऱ्याच कलाकारांनाही प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. त्यातही श्रीवल्लीवर भाळलेल्यांची संख्या तुलनेनं जास्त. 


आता तिच्या याच चाहत्यांमध्ये आणखी एकाची भर पडल्याचं दिसत आहे. बहुधा पुष्पाच्या प्रेमाहूनही श्रीवल्लीवरचं हे नवं प्रेम तिला जरा जास्तच आवडू शकतं. 


कारण, हे प्रेम आहे एका अबोल प्राण्याचं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जिथं भलामोठा चिंपांझी चक्क 'श्रीवल्ली' या गाण्यावर ठेका धरताना आणि या गाण्याची गाजलेली स्टेप करताना दिसत आहे. 


आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो व्ह्यूज मिळवून गेला आहे. पाहणाऱ्या प्रत्येकालाच हा व्हिडीओ पाहून धक्का बसत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Dinesh Sanu (@dinesh_adhi)


चिंपांझीची चालण्याची स्टाईल, आणि श्रीवल्ली गाण्याशी साधलेला मेळ पाहता या गाण्यासाठीची स्टेप इथूनच मिळाली का, असेही प्रश्न काही नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहेत. 


सत्य काहीही असो, पण सध्या हे चिंपांझीचं श्रीवल्ली प्रकरण तुफान गाजतंच हे मात्र नाकारता येत नाही.