मुंबई : अलीकडच्या काळात साऊथच्या चित्रपटांची क्रेझ इतकी वाढली आहे की, त्यांचे चित्रपटच नाही तर, त्यातील गाणी आणि सेलिब्रिटींनी देखील त्यांच्या ऍक्टिंगने चाहत्यांना भूरळ पडली आहे. एक काळ असा होता ही जेथे सगळे लोकं बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी खूप मेहनत घ्यायचे. परंतु साऊथ सिनेमा इंडस्ट्रीने आता तो दर्जा मिळवला आहे. ज्यामध्ये आता बॉलिवूडमधील सेलिब्रिटी देखील उतरले आहेत. त्याचा हा कल आता साउथ इंडस्ट्रीकडे वाढत चालला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमांना इतर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी हिंदीमध्ये डबिंग करुन सिनेमे पुन्हा रिलिज केले आणि त्या चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला.


साउथचे काही सिनेमे तर भलतेच हिट ठरले, ज्याला लोकांनी उचलून धरले. या सिनेमामाधील डायलॉग, ऍक्टिंग, गाणी सगळंच हिट ठरले. परंतु तुम्हाला माहितीय का? की हे सिनेमे हिट करण्यामागे जितकं अभिनेता आणि अभिनेत्री, डायरेक्टरचे कष्ट आहेत. तितकेच डिबिंग अर्टिस्टचे देखील आहेत. त्यांच्यामुळेच सगळ्यांपर्यंत हे सिनेमे पोहोचतात आणि हिट होतात.


त्यामुळे मोठ मोठ्या सिनेमामधील गाजलेल्या कलाकारांना किंवा त्याच्या भूमिकेला कोणी कोणी आवाज दिला हे जाणून घेणं आणि त्यांना त्यांच्या कामाचं श्रेय देणं गरजेचं आहे.


श्रेयस तळपदे



'पुष्पा : द राइज' हा चित्रपट जवळ-जवळ सगळ्यांनीच पाहिला असेल. अल्लू अर्जुनने बॉक्स ऑफिसवर तसेच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. श्रेयस तळपदेने 'पुष्पा'च्या हिंदी आवृत्तीत अल्लू अर्जुनला आवाज दिला आहे. श्रेयस तळपदे हा एक उत्तम अभिनेता तर आहेच पण तो एक चांगला डबिंग कलाकार देखील आहे.


अल्लू अर्जुन तसेच श्रेयसला 'पुष्पा'साठी प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. त्याचे डायलॉग रसिकांच्या मनात घर करून गेलेले आहेत. 'मैं झुकेगा नही साला' हा त्यांचा डायलॉग सर्वांच्याच जिभेवर आहे. पुष्पा व्यतिरिक्त श्रेयस ‘आला वैकांतपुरमल्लू’ या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन देखील डब करणार आहे.


शरद केळकर



'बाहुबली' चित्रपटाला केवळ दक्षिण भारतीय प्रेक्षकांचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे प्रेम मिळाले. हिंदीत रिलीज झालेल्या बाहुबलीमधील प्रभासच्या व्यक्तिरेखेला शरद केळकरने आपला आवाज दिला आहे. शरद केळकर हा उत्तम डबिंग कलाकार आहेत. त्याने केवळ दक्षिणेतच नाही तर अनेक हॉलिवूड चित्रपटांच्या हिंदी डबमध्येही आपला आवाज दिला आहे. प्रभासचा आवाज बनलालाशरद केळकर हे टीव्ही आणि चित्रपट विश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे.


'सात फेरे', 'उत्तरन' आणि 'एजंट राघव' सारख्या शोजमधून त्याने घराघरात आपले स्थान निर्माण केले आहे. त्याचबरोबर 'तान्हा जी' आणि 'लक्ष्मी' सारख्या मोठ्या चित्रपटात आपल्या अभिनयाने त्याने चाहत्यांची मने जिंकली. आता तो OTT वरही काम करत आहे. 'द फॅमिली मॅन 2' मधील त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांवर जादू केली आहे.


संकेत म्हात्रे



संकेत म्हात्रची भारतातील सर्वोत्कृष्ट व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आणि डबिंग आर्टिस्टमध्ये गणला केली जाते. त्याने अनेक दाक्षिणात्य कलाकारांना आपला आवाज दिला आहे. अल्लू अर्जुन, महेश बाबू आणि ज्युनियर एनटीआरसह अनेक दाक्षिणात्य स्टार्सचा या यादीत समावेश आहे. सूर्याच्या जय भीममध्येही संकेतने आपला आवाज दिला आहे.


त्याचबरोबर संकेतने अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्प आणि अॅनिमेटेड चित्रपटांचे डबिंगही केले आहे. इतकंच नाही तर संकेतने डिस्कव्हरी, टीएलसी या कार्यक्रमांसह टेलिव्हिजन जाहिराती आणि टेलिव्हिजनवरील रेडिओ स्पॉट्सनाही आपला आवाज दिला आहे.


विनोद कुलकर्णी



दक्षिणेतील दिग्गज कॉमेडियन आणि अभिनेते ब्रह्मानंदम यांची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्यांना पाहून प्रेक्षकांना हसू आवरत नाही. दाक्षिणात्य चित्रपटांमधील त्याच्या मिमिक्रीने तुम्हाला नक्कीच हसायला लावलं असेल. पण विनोद कुलकर्णी हे अवघड काम हिंदी डब केलेल्या चित्रपटात करतात. विद्रोही, कंदिरिगा, दोसुकेल्था, आर्य 2 आणि पॉवर यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी विनोदी ब्रह्मानंदमसाठी अनेकदा आवाज दिला आहे आणि त्यांच्या कॉमेडीला हिंदीतही जिवंत ठेवलं आहे.


मनोज पांडे



प्रभासचा सहकारी अभिनेता राणा डग्गुबती यानेही 'बाहुबली' चित्रपटात आपली ताकद दाखवली. त्याचवेळी मनोज पांडेने हिंदीतील राणा डग्गुबती या व्यक्तिरेखेला आवाज दिला. बाहुबली व्यतिरिक्त मनोज नेराणा यांनी अनेक चित्रपटांमध्ये दग्गुबतीला आवाज दिला आहे. याशिवाय, त्याने हॉलिवूडचा ऑल-टाइम ब्लॉकबस्टर चित्रपट अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉरमध्ये थानोसला आपला आवाज दिला आहे.


राजेश कावा



राजेश कावा हे एक उत्तम डबिंग कलाकार देखील आहेत, त्यांनी दक्षिणेतील सुपरस्टार विजय आणि धनुष यांच्यासाठी डबिंग केले आहे. राजेशने थंगा मगन, सुपरहिरो शहेनशाह, सिंघम 2, लिंगा, तिरुमलाई आणि ब्रह्मोत्सवम यासह अनेक चित्रपटांना आपला आवाज दिला आहे.