American Singer R Kelly: अमेरिकन पॉप सिंगर आर केली याला महिला आणि मुलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषी ठरल्यानंतर 30 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, 55 वर्षीय आर केली गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्कमध्ये लैंगिक तस्करी-संबंधित गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलं होतं. त्यानंतर त्याला 30 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या संपूर्ण प्रकरणावर शिक्षा सुनावल्यानंतर आर केलीच्या (R Kelly) वकिलाने पुढे अपील करणार असल्याचं सांगितलं होतं. सांगितलं जात आहे की, निकालाच्या वेळी केली तुरुंगातील ड्रेस आणि काळ्या चष्मामध्ये दिसला होता. यावेळी त्याने काहीही बोलण्यास नकार दिला, प्रतिसाद दिला नाही आणि मान खाली घातली.


अमेरिकी डिस्ट्रिक्ट कोर्ट (American District Court) जज एन डोनेली यांनी निकाल दिला की आर केलीने त्याच्या लैंगिकतेचा वापर शस्त्र म्हणून  केला, त्याने पीडितांना असह्य अशा पद्धतीने वागवलं जे सांगण्या जोगं नाहीये आणि पीडित नंतर लैंगिक संक्रमित रोगांना बळी पडल्या आहेत.


1994 साली केलीचं आणखी एक प्रकरण गाजलं. त्याने आलिया नावाच्या एका अल्पवयीन मुलीशी लग्न केलं. हे लग्न व्हावं म्हणून त्याने खोटी कागदपत्रं तयार केली. केलीच्या माजी मॅनेजरने कोर्टात साक्ष दिली की आलियाच्या, जी त्यावेळेस फक्त 15 वर्षांची होती, वयाचा खोटा दाखला बनवण्यासाठी त्याने एका सरकारी अधिकाऱ्याला लाच दिली.त्यावेळेस आलिया एक पॉप स्टार होती. खोट्या दाखल्यात तिचं वय 18 दाखवण्यात आलं त्यामुळे केली तिच्याशी लग्न करू शकला. त्यावेळी केलीचं वय 27 वर्षं इतकं होतं. मात्र एका विमान अपघातात आलियाचा मृत्यू झाला.


कोर्टात साक्ष देताना एका जेन (बदलेलं नाव) महिलेने सांगितलं की केलीने तिच्यावर कसे अत्याचार केले. "एकदा माझ्या मैत्रिणीला मी केलीविषयी मेसेज केला तेव्हा त्याने सैन्यात असतात तशा प्रकारच्या बुटांनी मला मारहाण केली. माझ्या संपूर्ण शरीरावर तो प्रहार करत होता आणि मी जीव वाचवून पळत होते." केलीने तिचे अपमानजनक व्हीडिओ रेकॉर्ड केल्याचंही तिने म्हटलं.



"तो शिक्षा म्हणून असे व्हीडिओ रेकॉर्ड करायचा. एकदा त्याने माझ्या चेहऱ्यावर विष्ठा लावायला सांगितलं आणि मी तसं करत असताना त्याने माझा व्हीडिओ रेकॉर्ड केला."


केलीसोबत स्टेज शेअर करणारी गायिक ( Singer Jovante Cunningham) म्हणाली की, या क्षणापर्यंत माझ्या आयुष्यात असा एकही दिवस आलेला नाही जेव्हा मला खरोखर विश्वास होता की न्यायव्यवस्था या प्रकरणातील सत्य बाहेर येईल. ती पुढे मीडियाला म्हणाली, ''मी या निकालाने खूप खूश आहे. मला माझ्या न्यायव्यवस्थेचा खूप अभिमान आहे. त्या वेदनेतून वाचलेल्या कॉम्रेड्सचाही मला अभिमान आहे.