R Madhavan : बॉलिवूड अभिनेता आर माधवनचा 'शैतान' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला. पहिल्यांदा अजय देवगनच्या चित्रपटात आर माधवन हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.  आता आर माधवनला अशा वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. हा ट्रेलर पाहून नक्कीच तुमच्या अंगावर शहारे येतील. मात्र, त्याची ही भूमिका पाहून अनेकांना आश्चर्य झाले. त्यात त्याची पत्नी देखील आहे. आर माधवननं स्वत: या गोष्टीचा खुलासा केला आहे की त्याच्या पत्नीचा स्वभाव कसा बदलला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर माधवननं 'शैतान' या चित्रपटात कोणालाही धक्का बसेल अशी भूमिका साकारली होती. त्यानं त्याच्या पत्नीविषयी एक गोष्ट एका मुलाखतीत शेअर केली. 'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत आर माधवननं सांगितलं की त्या भूमिकाचा परिणाम त्याच्या खासगी आयुष्यावर देखील होतोय. तर त्याच्या या लूकवर त्याच्या पत्नीची कशी प्रतिक्रिया होती ते सांगत आर माधवन म्हणाला की स्क्रीनवर या खतरनाक आणि खूंखार अवतारला पाहता त्याच्या पत्नीचा त्याच्याकडे पाहण्याचा अंदाज बदलला आहे. त्यानंतर जेव्हा पण त्याची पत्नी त्याच्याशी बोलते तेव्हा ती त्याच्यापासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यानं सांगितलं की त्याच्या या खतरनाक भूमिकेचा त्याच्या खासगी आयुष्यावर परिणाम होत आहे. 



त्यानं सांगितलं की त्यांना माहित नव्हत की 'शैतान' या चित्रपटाची हॉरर इंटेन्सिटी ही त्या पातळीला पोहोचेल असं वाटलं नव्हतं. जेव्हा चित्रपट साइन केला होता तेव्हा त्याला या गोष्टीची कल्पना नव्हती की लोक इतके घाबरतील. 


हेही वाचा : गगनात मावेना साठीत डोक्यावर केस उगवण्याचा आनंद! बोनी कपूर यांची हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी


'शैतान' चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट पुढच्या महिन्यात 8 मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत ज्योतिका ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची पटकथा अशा तांत्रिकची आहे जो अजय देवगणच्या मुलीला वशीकरण केल्याचं दाखवलं आहे. तर त्याला जे काही मिळवायचं आहे ते काम करून घेण्यासाठी तो तिचा वापर करतो. मात्र, अजय देवगण या सगळ्यातून त्याच्या मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो की नाही हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.