मुंबई : सलमान खान, बॉबी देओल, जॅकलिन फर्नांडीस यांची मल्टी स्टारर सिनेमा रेस ३ चे नवे गाणे सेल्फिश प्रदर्शित झाले. हे गाणे अगदी खास आहे. याचे मोठे कारण म्हणजे सलमानच्या लेखणीतून हे गाणे अवतरले आहे. तर पाकिस्‍तानी गायक आतिफ असलम आणि सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड लूलिया वंतूरने हे गाणे गायले आहे. लूलियाने यापूर्वीही काही गाणी गायली आहेत पण बॉलिवूडमधील हे तिचे पहिलेच गाणे आहे.


तिघांचा रोमान्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाण्यात जॅकलिन फर्नांडीस, सलमान खान आणि बॉबी देओल यांचा रोमांटिक अंदाज पाहायला मिळतो. या मल्‍टीस्‍टारर सिनेमात जबरदस्‍त अॅक्शनसह नात्यांची खिचडीही पाहायला मिळणार आहे. सिनेमाच्या पहिल्या गाण्यात जॅकलिन सलमानसोबत डान्स करताना दिसली होती. पण या गाण्यात त्यांचा हळूवार रोमांस पाहायला मिळणार आहे. हे पहा रेस ३ चे नवे गाणे...



या दिवशी होणार प्रदर्शित


या सिनेमाची निर्मिती सलमान खान फिल्म्स आणि रमेश तौरानीने टिप्स फिल्म्स बॅनरच्या अंतर्गत केली आहे. रेमो डीसुजा याने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. १५ जूनला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.