मुंबई  : बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा आगामी सिनेमा सध्या चर्चेत आहे. ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ असं या सिनेमाचं नाव असून, या सिनेमाला ऑनलाईन प्रदर्शित करण्यासाठी तब्बल २५० कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती. मात्र सलमाननं ओटीटीला साफ नकार दिलाय. राधे हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत थिएटरमध्येच प्रदर्शित होईल, अशी भूमिका त्याने घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीत सलमाननं राधे हा आपला सिनेमा कुठल्याही परिस्थितीत ओटीटीवर रिलीज न करण्याचा निर्णय घेतल्याचं ठामपणे म्हटलंय. सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही.


''आपला चित्रपट कुठल्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार नाही. तो नेहमी प्रमाणेच सिनेमागृहातच प्रदर्शित होईल असंही सलमान खाननं या वेळी स्पष्ट केलंय.''