Radhika Aapte controversial statement: बॉलीवुड अभिनेत्री राध‍िका आपटे बॉलीवूडमधील अभिनेत्रींपैकी एक जीने आपल्या अभिनयाच्या जोरावर कमी वेळात आपलं स्थान निर्माण केलय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2005 साली 'वाह! लाइफ हो तो ऐसी' सिनेमातून तिने आपल्या  सुरवात केली. त्यानंतर आजपर्यंत तब्बल १७ वर्ष राधिकाने अनेक वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे केले आणि कधीच मागे वळूनसुद्धा पाहिलं नाही. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत राधिकाने अनेक सिनेमे स्वबळावर प्रसिद्ध केले.  (Radhika aapte controversial statement on bollywood said makers wants small age girls )


नेहमीच हटके सिनेमे करणारी राधिका पर्सनल आयुष्यातसुद्धा तितकीच बोल्ड आणि बिनधास्त आहे . राधिका आपटे ने आपल्या फिल्मी करिअर मध्ये  खुराणा राजकुमार रावसोबत काम केलं आहे. 


आणखी वाचा: पहिल्या सिनेमासाठी त्याचसोबत रात्रभर..मराठमोळ्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा..


पण राधिकाच्या आयुष्यातसुद्धा बरेच ट्विस्ट आले होते ज्यावेळी ती ३७ वर्षांची होती काही सिनेमांमध्ये तिला काम मिळेनासा झालं तिला घेतलं गेलं नाही त्याच कारण होत कि मेकर्सना कमी वयाच्या अभिनेत्री हव्या होत्या.


कित्येकदा तिला हे सांगण्यात यायचं कि ''जर तीच वय आणखी लहान असत तर हा रोल तिला ऑफर केला गेला असता ''याच बाबतीत राधिकाने आता एक मोठं वक्तव्य केल आहे ज्याची खूप चर्चा सध्या चालू आहे. 


राधिका म्हणते की, काळानुसार इंडस्ट्रीत स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही गोष्टी चांगल्या होत आहेत. पण हेही खरे आहे की, तरुण दिसण्यासाठी तिने कधीही कुठलाही हट्ट धरला नाही. 


सुंदर दिसण्यासाठी  सध्या सर्वजणचं धडपडतात. दिसण्यापेक्षा प्रेक्षक अभिनयावर जास्त प्रेम करतो, कलाकारांच्या अभिनयाने काही सिनेमे सुपरहिट होतात याची अनेक उदाहरणं आहेत. कलाकारांचे कितीतरी सिनेमे सपशेल आपटले आहेत याची सुद्धा खूप उदाहरण आहेत. 


 


सध्या राधिकाच्या या वक्तव्याने साध्य सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Radhika aapte controversial statement on bollywood said makers wants small age girls )