बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे लवकरच पहिल्यांदा आई होणार आहे. राधिकाने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये राधिकाने सिनेमा 'सिस्टर मिडनाइट'ची बीएफआय लंडन फिल्म फेस्टिवलच्या स्क्रिनिंगमध्ये रेड कार्पेटची काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती आपल्या टीमसोबत दिसत आहे. एवढंच नव्हे तिने शेअर केलेल्या फोटोत तिचे बेबी बंप दिसत आङे. सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एवढंच नव्हे तर यावेळी तिने बेबी बंप देखील दाखवले आहे.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंस्टाग्रामवर आपला लूक शेअर करताना राधिका आपटेने प्रेग्नेन्सीचा उल्लेख केला नाही. पण तिने कॅप्शनमध्ये सिस्टर मिडनाइट प्रिमीयर लिहिलं आहे. काही फोटोमध्ये राधिका सोलो पोझ दिसताना दिसत आहे. 



राधिका आपटेने 2012 साली ब्रिटिश वायलिन वादक आणि संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केलं आहे. लंडन आणि मुंबईमध्ये अशा दोन्ही ठिकाणी हे कपल वेळ घालवत असतात. पण हे दोघं लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करतात. या दोघांची भेट 2011 साली राधिका कंटेम्परी डान्स शिखण्यासाठी लंडनला गेली होती. त्यानंतर दोघं एकत्र राहायला लागले.



2013 मध्ये ऑफिशियल सेरेमनीच्या अगोदर 2012 मध्ये त्यांचा अतिशय छोट्याशा कार्यक्रमात लग्नसोहळा झाला. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, राधिका आपटे श्रीराम राघवन दिग्दर्शित मेरी ख्रिसमसमध्ये दिसली होती आणि कतरिना कैफ आणि विजय सेतुपती अभिनीत होती. याशिवाय ती कीर्ती सुरेशसोबत अक्का या थ्रिलर मालिकेतही दिसणार आहे.