Radhika Apte Wedding  : बॉलिवूडमध्ये अनेक विचित्र गोष्टी घडतं असतात. त्यातील अनेक किस्से बऱ्याच वर्षांनंतर जगासमोर येतात. असाच एका अभिनेत्रीचा लग्नाचा किस्सा आहे.  वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करत आणि वेब सीरिजमधून बोल्ड अभिनेत्री अशी ओळख निर्माण झाली. ही दुसरी तिसरी कोणी नसून खऱ्या आयुष्यातही बोल्ड असणारी राधिका आपटे...राधिका आपटेने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत जे वेगवेगळे भूमिका केल्या त्यानंतर तिचा चाहत्या वर्ग मोठा आहे. राधिका आपटेच्या लग्नाचा एक किस्सा समोर आला आहे, जो ऐकून चाहत्यांना नक्कीच धक्का बसेल. 



तिने लग्न झाल्याचं लपवलं होतं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हो, राधिका आपटने ब्रिटीश व्हायलिन वादक आणि संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केलं होतं. 2012 तिने लग्न केलं पण या लग्नाची घोषणा तिने  2013 मध्ये अधिकृतपण केली. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्याकडे लग्नाचा एकही फोटो नाही. 



लाइमलाइटपासून दूर जाऊन लग्न


एका मुलाखतीत, तिने खुलासा केला की, 10 वर्षांपूर्वी बेनेडिक्टसोबत लग्न झालं तेव्हा फोटो काढायचं ते विसरले. तिने घरच्या घरी काही मित्रांच्या उपस्थितीत लग्न केलं होतं. हे लग्न उत्तर इंग्लंडमध्ये झालं. विशेष म्हणजे या लग्नाला आलेले वऱ्हाडी फोटोग्राफर असूनही ते लग्नाचे क्षण टिपण्यास विसरले. कोण म्हणजे कोणीही त्यादिवशी फोटो काढला नाही. 



फोटो काढण्यास का विसरली राधिका?


हे विश्वास बसायला जरा कठीण आहे, पण स्वत: राधिकाने यामागील कारण स्पष्ट केलं आहे. ती म्हणाली की, लग्नाच्या दिवशी नवरदेव नवरीपासून वऱ्हाडी म्हणजे राधिका आणि बेनेडिक्ट, मित्रपरिवार सगळे दारुच्या नशेत होते. त्यामुळे आम्ही सगळे फोटो काढायला विसरलो. राधिकाच्या लग्नाची ही मजेदार गोष्ट अनेकांना माहिती नाही. 



पतीबद्दल राधिकाची तक्रार 


ती पुढे असंही म्हणाली की, तिचे पती खूप वाईट आहेत. कारण त्यांना एकही फोटो क्लिक करायला मुळीच आवडतं नाही. पण जेव्हा ते कुठे फिरायला जातात तेव्हा ते त्या क्षणाचे काही फोटो नक्की काढतात.