कारमध्ये AC... सोपं नव्हतं हे काम; पाहा कशी तयार झाली जगातील पहिली एअर कंडिशनर कार

Auto News : हाताशी स्वत:चं वाहन असल्यामुळं मिळणारं स्वातंत्र्य, वाटेल तेव्हा वाटेल तिथं पोहोचण्याची मुभा आणि अर्थातच अडीनडीच्या वेळेचा उपयोगी येणारं साधन म्हणून या कारकडे पाहिलं जातं. 

Jun 28, 2024, 14:38 PM IST

Auto News : कार... मागील काही वर्षांमध्ये सर्वसामान्यांपासून धनाढ्य व्य़क्तींपर्यंत कार हा विषय बहुतांशी Luxury राहिला नसून हा विषय अनेकांसाठी काळाजी गरज ठरताना दिसत आहे. 

1/8

बदल

Auto news First AC car History photos

काळ बदलला त्याप्रमाणं कारचे डिझाईन आणि त्यांच्या इतर अंतर्गत भागांमध्ये मोठे बदल होण्यास सुरुवात झाली. सध्या तर, AC नसलेल्या कारचा विचारही अनेकां अशक्य वाटतो. पण, कारमध्ये ही वातानुकुलित यंत्रणा लागू करणं किती आव्हानात्मक होकं तुम्हाला माहितीये?   

2/8

AC ची गरज

Auto news First AC car History photos

एक काळ असा होता जेव्हा जगभरातील अनेकांकडे असणाऱ्या कार Open Deck च्या होत्या. पुढं AC ची गरज आणि वापर ओळखून कारमध्येही ही यंत्रणा लागू करण्यात आली. इथं अनेक आव्हानांचाही सामना करावा लागला.   

3/8

पॅकार्ड

Auto news First AC car History photos

अमेरिकेच्या पॅकार्ड मोटर कंपनीनं 1939 मध्ये जगातील पहिली AC कार सादर केली. जेम्स वॉर्ड पॅकार्ड यांनी या कंपनीची सुरुवात केली हगोती. त्यांच्या या कंपनीनं 1899 मध्ये कार निर्मितीस सुरुवात केली होती. 

4/8

इंजिन

Auto news First AC car History photos

या कंपनीनं कारमध्ये AC चा पर्याय उपलब्ध करून दिला. हा एसी सुरु करण्यासाठी इंजिन बंद करावं लागत असे. ही बाब बऱ्याच अडचणींची होती. पहिल्या कारमधील AC यंत्रणेतील इवॅपोरेटर आणि ब्लोअर कारमध्ये एखाद्या ट्रंकेइतकी जागा व्यापत. 

5/8

यंत्रणा

Auto news First AC car History photos

पहिल्या AC कारमध्ये ही यंत्रणा कारच्या मागील बाजूस असे. कारच्या मागील विंडशील्डवर एसीचा पंखा अस. ज्यामुळं कारचा मागील भागही थंड राहत असे. तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी कारमध्ये थर्मोस्टेट किंवा शटऑफ मॅकेनिजमची व्यवस्था नव्हती. चालकांकडे इथं एकच कंट्रोल ब्लोअर असे. हा ब्लोअर बंद करूनही त्याची थंड हवा केबिनमध्ये येत असत. 

6/8

इंजिन कंपार्टमेंट

Auto news First AC car History photos

पहिल्या एसी कारमध्ये इंजिन कंपार्टमेंट आणि ट्रंकपर्यंत येणारी पाईपलाईन जपण्यास क्लिष्ट होती. कारमध्ये एसी लावला खरा, पण ही यंत्रणा फारच गोंधळाची होती. शिवाय कारमध्ये एसी लावणं अधिक खर्चिक होतं. त्यामुळं या कंपनीनं 1941 मध्ये या कारची निर्मिती थांबवली.   

7/8

1953 मध्ये एसी कार

Auto news First AC car History photos

पॅकार्डमागोमाग पुन्हा 1953 मध्ये एसी कार परतल्या. जनरल मोटर्सच्या हॅरिसन रेडिएटर डिवीजननं ही यंत्रणा नव्या रुपात समोर आणली. काळ बदलला आणि AC कारची मागणीसुद्धा तितक्याच वेगानं वाढली आणि आज तुम्ही ज्या स्वरुपात कारमधील एसी पाहता त्याच रुपात ती समोर येत गेली.... 

8/8

पहिली एसी कार

Auto news First AC car History photos

आजच्या घडीला बाजारात अनेक कंपन्या कारमध्ये AC ची सुविधा पुरवतात. पण, तरीही ही पहिली एसी कार खासच आहे... नाही का?