'कल्की2898 AD'मध्ये 'या' पाहुण्या कालारांच्या लक्षवेधी भूमिका

‘Kalki 2898 AD’ Guest Actors :  प्रभास, दीपिका आणि बिग बी यांचा कल्की सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतोय.  या तिन्ही बड्या कलाकारांची  केमिस्ट्री अनुभवण्यासाठी सिनेमाचं अगाऊ बुकींग देखील करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या सिनेविश्वात कल्की इतर सिनेमांना चांगलीच टक्कर देत आहे.  

Jun 28, 2024, 14:36 PM IST

एस. एस राजामौली आणि राम गोपाल वर्मा या जोडीचा हा साय फाय सिनेमा लोकांच्या पसंतीस चांगला उतरतोय.

1/8

भूमिका छोटी असो किंवा मोठी, ती प्रेक्षकांवर  किती प्रभाव टाकते यावरुन तिचं महत्त्व स्पष्ट होतं. 

2/8

कल्कीमध्ये दीपिका, प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्यासारखे नावाजलेले कलाकार, जरी असले तरी सिनेमातील काही पाहुण्या कलाकारांमुळे यात आणखीनच ट्विट आला आहे. 

3/8

मृणाल ठाकूर

'सीता रामन' आणि  बऱ्याचशा सिनेमातून मृणाल ठाकूरने आपल्या सौंदर्याची आणि अभिनयाची छाप सोडली. 

4/8

'सीता रामन' हिट झाल्यानंतर मृणालने कल्कीमध्ये साकारलेल्या दिव्याच्या छोट्याशा भूमिकेने अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. 'कल्की'मध्ये मृणालची एन्ट्री पाहता तिच्या चाहत्यांसाठी हा आश्चर्याचा धक्का होता.    

5/8

'विजय देवरकोंडा'

साऊथसिनेविश्वातील गाजलेला अभिनेता 'विजय देवरकोंडा' हा देखील कल्की सिनेमाचा भाग असल्याचं कळताच त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. विजय या सिनेमात 'अर्जून' ही व्यक्तिरेखा साकारत आहे. 

6/8

'दुल्कर सलमान'

'सीता रामन' आणि 'किंग ऑफ कोठा'मधून झळकलेला  अभिनेता दुलकर सलमान देखील कल्की सिनेमात पाहुणा कलाकार झळकत आहे. 

7/8

'राम गोपाल वर्मा'

'कल्की' 2898 एडी' राम गोपाल वर्मा यांनी काही छोटाशी साकारलेली भूमिका खूपच प्रभाव टाकते. 

8/8

अर्जुन दास

महाभारताच्या कथेचा आधार घेत साकारलेल्या 'कल्की' सिनेमात श्री कृष्णाच्या भुमिकेला 'अर्जुन दास' यांनी त्यांचा आवाज दिला आहे. सिनेमात 'कृष्ण' दिसत नसला तरी त्याच्या आवाजातून तो सिनेमात कायम जाणवतो.