मुंबई : अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन' या सिनेमांत बोल्ड आणि ग्लॅमरस राधिका आपटे देखील आहे. यावेळी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राधिका आपटेने यावेळी आपल्या पहिल्या पिरिएड्सची आठवण शेअर केली. तिने न घाबरता ही गोष्ट सगळ्यांसमोर शेअर केली. ती म्हणाली की, माझ्या कुटुंबात सगळे डॉक्टर आहेत. यामुळे माझ्या घरी जुन्या पद्धतीच्या जालिरिती पाळल्या जात नाहीत. मला पाळी येण्याअगोदरच या सगळ्याची माहिती दिली होती. मात्र असं असलं तरीही माझी पहिली पाळी ज्या दिवशी आली त्यादिवशी मी खूप रडली. खरं म्हणजे माझ्या शरिरात झालेल्या या बदलाला मी घाबरले होते.


काय मिळालं गिफ्ट ? 


मात्र या सगळ्यावर माझ्या आईने उत्तम रामबाण उपाय केला तोम्हणजे घरी तिने एक छोटी पार्टी दिली. त्या पार्टीला माझे सर्व नातेवाईक, मित्र परिवार उपस्थित होते. पहिल्या मासिक पाळीच्या दिवशी घड्याल गिफ्ट मिळालं होतं. तसेच अनेक गोष्टी देखील दिल्या होत्या. सुरूवातीला मला देखील सॅनेटरी पॅड घ्यायला लाज वाटत होती मात्र मी एक दिवस निश्चय केला की, मी न घाबरता पॅड खरेदी करणार. एक दिवशी मी न घाबरता दुकानदाराकडे मोठ्याने बोलून सॅनिटरी पॅड मागितले आणि माझी भीति दूर केली. 


अक्षय कुमार पॅडमॅन हा चित्रपट घेऊन येतो आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. या ट्रेलरमध्ये अक्षय आपल्याला मोडकतुडके इंग्रजी बोलताना दिसत आहे. माणूस वेडा असेल तरच तो प्रगती करू शकतो असे देखील अक्षय या ट्रेलरमध्ये म्हणत आहे. पॅडमॅन या चित्रपटात अरुणाचल मधील मुरुगनाथम यांच्या जीवनाचा संघर्ष आणि स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दाखविण्यात येणार आहे. या ट्रेलरमध्ये तो वेगवेगळ्या पद्धतीने पॅड बनवताना दिसत आहे.