राधिका आपटेचे बोल्ड फोटो इंटरनेटवर व्हायरल... चाहते म्हणाले, ``समुद्रात लावली आग``
तिच्या वेगळ्या आणि चोखंदळ अभिनयासाठी तिचे सर्वत्र कौतुक होत असते.
Radhika Apte Bold Photoshoot: राधिका आपटे वेबविश्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या वेगळ्या आणि चोखंदळ अभिनयासाठी तिचे सर्वत्र कौतुक होत असते. ती तिच्या बोल्डनेसमुळे कायमच चर्चेत असते.
राधिकाच्या अभिनयासोबतचं तिच्या व्यक्तिरेखा निवडीवरही चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करतात. नुकतंच राधिकाने आपलं एक बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या फोटोंमुळे इंटरनेटवर सध्या तिचीच चर्चा आहे. या फोटोवर तिच्या चाहत्यांनी तिच्यावर तुफान कमेंट्सचा पाऊस पडाला आहे.
राधिकाने हे फोटोशूट खास लोकप्रिय बाजार इंडिया मॅगझिनसाठी केले आहे. या शूटबरोबरच तिनं बॉडी पॉझिटिव्हिटी हा संदेश दिला आहे. हे फोटोशूट करताना तिनं समुद्रात स्विमसूट घालून जलपरीप्रमाणे पोझेज दिल्या आहेत. त्यामुळे तिच्या या बोल्ड फोटोशूटवर चाहते फिदा झाले आहेत. राधिका आपटे समुद्राच्या काठावर उभी आहे. तिने खूप बोल्ड ड्रेस घातला आहे, ज्यामध्ये तिची स्टाइल पाहून तिच्या चाहत्यांची मनं घायाळ झाली आहेत.
शरीराच्या सकारात्मकतेवर बोलताना राधिका आपटे म्हणते की, जेव्हा आपण मोठे होतो, तेव्हा आपल्यात सौंदर्याबद्दल वेगवेगळे समज असतात, ज्याचा आपल्या मनावर वेगळा परिणाम होतो. या गोष्टी कधी कधी आपल्याला अशा वळणावर आणतात की आपण स्वतःचा तिरस्कार करू लागतो. परंतु आपल्या शरीरावर प्रेम करणे गरजेचे आहे. असुरक्षितता समजून घेणे आणि तपासून घेणे आवश्यक आहे. आपल्याला एक गोष्ट स्विकारायची आहे आणि ते म्हणजे आपण प्रत्येक जण वेगळे आहोत.
आज बुधवारी बॉलिवूड चित्रपट विक्रम वेधाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि सैफ अली खान व्यतिरिक्त राधिका आपटे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.