Nana Patekar : काही कलाकार हे त्यांच्या कलाकृतींच्या बळावर इतके मोठे होतात, की कालांतरानं त्यांचं नाव जरी घेतलं तरीह त्यांच्या कलेची व्याप्ती डोळ्यांपुढे येते. नाना पाटेकर (Nana Patekar) हे असंच एक नाव. अभिनय क्षेत्रात एक वेगळी शैली प्रस्थापित करत त्या शैलीवर प्रेक्षकांना प्रेम करायला भाग पाडण्याचं काम नानांनी केलं. त्यांनी साकारलेलं प्रत्येक पात्र चाहत्यांच्या मनात कायमस्वरुपी घर करुन गेलं. रुपेरी पडद्यावर दमदार भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या याच नानांनी जितकी प्रसिद्धी मिळवली, तितकीच माणुसकीही जपली. (Nana Patekar Grand Daughter)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(Society) समाजाप्रती आपण काही देणं लादतो ही बाब कायम ध्यानात ठेवत नानांनी कलाक्षेत्रातील कारकिर्दीत एका वळणावर पोहोचल्यानंतर वेगळी वाट निवडली. त्यांचं काम अनेकांना आधार देणारं ठरलं. 


साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याच वाक्याची जाणीव नानांचं राहणीमान आणि त्यांची वैचारिक दृष्टी पाहून लक्षात आली. हाच अभिनेता निवांत क्षण मिळतात तेव्हा त्यांच्या मनाच्या जवळ असणाऱ्यांसोबत वेळ घालवण्याला प्राधान्य देतो. 


नानांच्या जवळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांच्या चिमुकल्या नातीचाही समावेश आहे बरं. सोशल मीडियावर (Social Media) तिच्यासोबतचा त्यांचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये नाना तिला झाडावर चढायला शिकवत आहे. पाय घसरला तर का, पडशील.... असं म्हणत ते तिच्या मनातील भीती घालवण्याचा प्रयत्नही करत आहेत. 


पाहा : Video Viral : नाना इतक्या आपुलकीनं कुणाचा पाहुणचार करताहेत? त्यांच्यासाठी सर्वच सेलिब्रिटी


चिमुकलीला खेळवताना तिच्यासोबत काही क्षण स्वत:सुद्धा बालपणात रमणाऱ्या नानांचा व्हिडीओ शेअर केला आहे, गायक- अभिनेता राहुल देशपांडे यानं (Rahul deshpande instagram). त्यामध्ये दिसणारी नानांची नात, म्हणजे राहुलचीच मुलगी रेणुका (Renuka Deshpande). 



Simple pleasures ! Nana Ajoba!! असं अतिशय बोलकं कॅप्शन देत राहुलनं हा Video शेअर केला. सुख म्हणजे नक्की काय, असं लिहित त्यानंच सुखाची परिभाषा इथं मांडली. तुम्हाला कशी वाटली नाना आणि त्यांच्या नातीची ही सॉलिड टीम?