मुंबई : 'बिग बॉस 14' चा रनर अप राहुल वैद्य एक अतिशय लोकप्रिय गायक आहे. नवरात्रीच्या सुरुवातीला, त्याचं एक नवरात्री विशेष गाणं 'गरबे की रात' रिलीज झालं. या गाण्यात त्यांनी 'श्री मोगल माँ’चा उल्लेख केला आहे ज्यांची गुजरातमध्ये पूजा केली जाते. पण  त्यांच्या भक्तांना गाण्यात देवीच्या नावाचा केलेला वापर आवडलेला नाही. परिणामी भक्तांच्या भावना दुखावल्यामुळे राहुलला अडचणींचा सामना करावा लागत आहे. एवढंच नाही तर आता राहुलला फोन आणि मेसेजच्या माध्यमातून  जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ई-टाइम्सशी संवाद साधताना राहुल वैद्यचे प्रवक्ता म्हणाले, 'काल रात्रीपासूमन कॉल्स आणि मेसेजचं प्रमाण वाढलं आहे. शिवाय त्याला जीवे मारण्याची धमकी देखील येत आहे आणि गुन्हा दाखल करण्याचं बोललं जात आहे. गाण्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही त्यांच्या भावनांचा सन्मान '



एवढंच नाही तर राहुलच्या टीमने आम्ही सर्वकाही ठिक करण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण ज्या पद्धतीने आम्ही गाणं लॉन्च केलंय त्यात बदल करण्यासाठी थोडा वेळ लागेल. असं राहुलचे प्रवक्ता म्हणाले. गरब्याच्या या नव्या गाण्यामुळे राहुल प्रचंड चर्चेत आला आहे. 


गाण्याबद्दल सांगायचं झालं तर, गाण्यामध्ये राहुलसोबत अभिनेत्री निया शर्मा गरबा खेळताना दिसत आहे.  गाण्यात राहुल वैद्य आणि निया शर्मा पहिल्यांदा एकत्र झळकले आहेत. गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं असलं तरी रिल्स तयार करण्यासाठी 'गरबे की रात' गाणं प्रसिद्ध झालं आहे.