मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची अटक ही सगळ्यांसाठीच खळबळजनक घटना होती. त्यात आता हे प्रकरण वेगळच वळणं घेत आहे. त्यात आता आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांनी पोर्नोग्राफी फिल्मसचं शुटींग करत असलेल्या 11 जणांना अटक केली होती. तेव्हापासूनच पोलिस या केसचा सखोल तपास करत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध पोलिस तेव्हापासूनच घेत होते. अनेकांची चौकशी केल्यानंतर पोलिसांना या संपूर्ण रॅकेटमध्ये मोठा चेहरा असल्याचं लक्षात आलं. आणि पाच महिन्यांच्या तपासानंतर बॉलिवूडमधील मोठं नाव या प्रकरणात असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी अचानक या प्रकरणात बिझनेसमन राज कुंद्राला अटक केली. 


पण पोर्नोग्राफी निर्मिती प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून राज कुंद्राच्या अटकेसाठी पोलिसांनी इतका वेळ का घेतला? असा सवाल देखील विचारला जात आहे. असं बोललं जातंय की, राज कुंद्राने आतापर्यंत आपले गुन्हे लपवण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांना लाच दिली आणि आपला गुन्हा उघड होऊ नये यासाठी 25 लाख रुपये मोजले.


या प्रकरणातील आणखी एक आरोपी अरविंद श्रीवास्तव उर्फ ​​यश ठाकूर जो सध्या फरार आहे, त्याने  मुंबईच्या एसीबींना राज कुंद्राने लाच दिल्याची माहिती दिली, त्यानंतर राज कुंद्राला अटक करण्यात आली.


राज कुंद्राने अटक टाळण्यासाठी  25 लाखांची रक्कम मोजली होती, पण यश ठाकूरने शेवटी राज कुंद्राची पोलखोल केली आणि तो जाळ्यात अडकला असं बोललं जात आहे.


दरम्यान राज कुंद्राचा वकील त्याला तुरूंगातून बाहेर काढण्यासाठी जमेल ते प्रयत्न करीत आहे. राज कुंद्राच्या वकिलाने असा युक्तिवाद केला आहे की व्हिडिओंमध्ये अश्लील गोष्टी आहेत,पण त्या पोर्नोग्राफी फिल्मस नाहीत.