मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्रा यांनी पॉर्नोग्राफी प्रकरणावर पहिल्यांदाच आपली भावना व्यक्त केली आहे. (Raj Kundra Statement On Pornography Case) शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या कुटुंबासाठी मागील काही काळ खूप कठीण गेला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक झाल्यानंतर आता राज कुंद्रा यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. जामिनावर बाहेर आलेल्या राज कुंद्राने मीडियाला या प्रकरणात ढवळाढवळ न करण्याचे आणि गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले आहे.


राज कुंद्राची पहिली प्रतिक्रिया 


राज कुंद्रा यांनी आपले निवेदन प्रसिद्ध करताना म्हटले आहे की, "बर्‍याच चिंतनानंतर मला असे वाटले की, सर्व दिशाभूल करणारी आणि बेजबाबदार विधाने आणि अनेक लेखांवरील माझे मौन कमकुवतपणा मानले जात आहे. 


माझ्या आयुष्यात मी कधीही "पोर्नोग्राफी" च्या निर्मिती आणि वितरणामध्ये सहभागी नाही. हा संपूर्ण प्रकार Witch Hunt सारखेच आहे. हे प्रकरण प्रलंबित आहे म्हणून मी यावर बोलू शकत नाही, परंतु मी खटल्याला सामोरे जाण्यास तयार आहे. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. सत्य हेच प्रबळ आहे. 


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना पॉर्नोग्राफी प्रकरणात दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मागणाऱ्या कुंद्राच्या अटकेला चार आठवड्यांसाठी स्थगिती दिली आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारला नोटीसही बजावण्यात आली आहे.


याप्रकरणी आपल्याला अटक करण्यात आल्याचे राज कुंद्रा यांनी न्यायालयाला सांगितले होते. या प्रकरणी जामीन मंजूर करण्यात आला आहे. आता याच प्रकारची आणखी एक एफआयआर नोंदवण्यात आली आहे.


शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या कुटुंबासाठी मागील काही काळ खूप कठीण गेला आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक झाल्यानंतर आता राज कुंद्रा यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.


शिल्पा शेट्टीच्या पतीवर अश्लील चित्रपट बनवण्याचा आणि मोबाईल ऍपद्वारे प्रसारित केल्याचा गुन्हा दाखल आहे. ज्यामध्ये राज कुंद्रा 60 दिवस तुरुंगात राहिला, 60 दिवसांनंतर राज कुंद्राला कोर्टातून जामीन मिळाला.