पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर पहिल्यांदा राज कुंद्राचा चेहरा समोर, ट्रोलर्स म्हणाले, `अरे फेस शील्ड...`
शिल्पानं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
मुंबई : शारदीय नवरात्र सुरु आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. दुर्गाष्टमीही ३ ऑक्टोबरला होती. यावेळी सर्वांनी कन्येची पूजा केली. सर्वसामान्यांव्यतिरिक्त बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हा चांगलाच साजरा केला. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं (Shilpa Shetty) आपली मुलगी शमिषाचे फोटो शेअर केले आहेत. याशिवाय तिनं कन्यापूजनाचा व्हिडिओही शेअर केला आहे. यावेळी व्हिडीओत ती नाही तर राज कुंद्रा (Raj Kundra) दिसत होता, तोही मास्कशिवाय. हे पाहून लोकांनी कमेंट करायला सुरुवात केली. काय बोलले होते ते आम्ही तुम्हाला सांगतो.
शिल्पानं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत शमिषा स्टूलवर बसलेली असून तिच्या चष्म्याशी खेळताना दिसते. कपड्याने पाय वाळवल्यानंतर राज तिच्या पायाला लाल चंदनाचा टिळा लावतो. त्यानंतर अक्षदा वाहतो. त्यानंतर शमिषाची आरती करतो. (Raj Kundra Get Trolled After Kanya Pujan To Daughter Shamisha Watch The Video)
हा व्हिडिओ शेअर करत शिल्पानं कॅप्शन दिलं की, 'माझ्या घरच्या महागौरीसोबत कांचिका पूजा. सनग्लासेस पहायला विसरू नका. माझ्या सर्व इन्स्टा कुटुंबाला आणि सर्व छोट्या लक्ष्मीला अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.'
शिल्पाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. फलक नाज, निशा रावल, फराह खान आणि इतरांनी शमिषाच्या क्यूटनेसचे कौतुक केले. तर दुसरीकडे, नेटकऱ्यांनी राजला मास्क शिवाय पाहताच ट्रोल केलं आहे. एक नेटकरी म्हणाला, '900 उंदीर खाऊन मांजर हजला गेली.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'छान, पण बाहेरच्या मुलीचा असा आदर करा, कुंद्रा जी.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'अहो कुठे गेली फेस शील्ड. आज तोंड दाखवलं.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'सर्व पापं धुतले जातील.'