राज कुंद्राचा शिल्पा शेट्टीबाबत महत्त्वाचा निर्णय, तुम्ही म्हणाल राजचा निर्णय अखेर योग्य
राज कुंद्रा तुरुंगातून बाहेर आल्यापासून त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहिलं जात आहे.
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा तुरुंगातून बाहेर आल्यापासून त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहिलं जात आहे. मीडियासमोर तो क्वचितच दिसतो. अलीकडेच शमिता शेट्टीच्या वाढदिवसाला तो शिल्पा शेट्टीसोबत स्पॉट झाला होता. पण आता पुन्हा एकदा राज कुंद्रा चर्चेत आला आहे.
गेल्यावर्षी राज कुंद्रा एका पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यानंतर प्रसिद्धीझोतात आला होता. त्यावेळी शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर आपल्या गोपनीयतेचा आदर करावा, असं आवाहन केलं होतं. पण आता बातमी आली आहे की, राज कुंद्राने त्यांचे ३८.५ कोटी किमतीचे पाच फ्लॅट शिल्पा शेट्टीच्या नावे केले आहेत. एका रिपोर्टनुसार, राज कुंद्राने हे सगळे फ्लॅट पत्नी शिल्पा शेट्टीला दिले आहेत. ज्यासाठी शिल्पा शेट्टीने 1.92 कोटी रुपये भरले आहेत.
एका वेबसाइटनुसार, राज कुंद्राने त्यांच्या पत्नीच्या नावावर हस्तांतरित केलेली प्रॉपर्टी एकूण क्षेत्र 5,996 स्क्वेअर फूट आहेत. यामध्ये त्याची ५ घर देखील आहेत. ज्यामध्ये दोघांनी त्यांचा सध्याचा पत्ता दिला आहे. 21 जानेवारी 2022 रोजी कागदपत्रांची नोंदणी झाल्याचं सांगण्यात येत आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची ही बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
शिल्पाचं वर्कफ्रंट
शिल्पा शेट्टी सध्या टीव्हीवरील 'इंडियाज गॉट टॅलेंट' या रिअॅलिटी शोला जज करत आहे. यापूर्वी मलायका अरोरा 'इंडियाज गॉट टॅलेंट'ला जज करायची. याशिवाय काही काळापूर्वी तिचा 'हंगामा 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यापूर्वी त्याने सुपर डान्सर या डान्सिंग रिएलिटी शोला जज केलं होतं.