Raj Kundra Standup Comedy : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा त्याच्या मास्कमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र, आता त्याचं चर्चेत असण्याचं कारण त्याचं स्टॅन्डप कॉमेडीमध्ये पदार्पण आहे. राज कुंद्रा हा स्टॅन्डअप कॉमेडियनच्या अवतारात आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचा स्टॅन्डअप कॉडमेडीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत राज कुंद्रा हा त्याच्यावर असलेले आरोप हळूच नाकारत स्पष्टीकरण देताना दिसत आहे. राजनं यावेळी त्याच्या कामाविषयी वक्तव्य केलं आहे. 


राज कुंद्राचं स्टॅन्डअप कॉमेडी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॉर्न फिल्म बनवत त्यांना हॉटशॉट्स अॅपवर विकल्याचे त्याच्यावर आरोप होते. त्या प्रकरणात 2021 मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. राज कुंद्राला 63 दिवस तुरुंगवास झाला होता. तुरुंगातून बाहेर आल्यापासून राज सतत मास्क लावून असतो. या कार्यक्रमात देखील राज हा मास्कमध्येच दिसला आहे. यावेळी राज बोलताना दिसतो की शो सुरु होण्याआधी दोन गोष्टी सांगायच्या आहेत, एक कोणाला सेक्शुअल जोकवर आक्षेप असेल तर 10 मिनिटे बाहेर जा. जेव्हा तिथून कोणी जात नाही तर तो म्हणतो की ठर्की प्रेक्षक आहेत. त्यानंतर राज कुंद्रा त्याची ओळख करत म्हणाला की लेडिज अॅन्ड जेन्टलमन, माझं नाव राज कुंद्रा, मला लोक मास्क मॅनच्या नावानं ओळखतात. मला शिल्पाचा नवरा म्हणून देखील ओळखतात. त्याशिवाय मला सस्ता कान्ये वेस्ट देखील बोलतात.'  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कपडे काढायचं नाही तर काय आहे राज कुंद्राचं खरं काम...


पुढे राज कुंद्रा बोलतो की '18 वर्षांचा होतो तेव्हा लंडनमध्ये टॅक्सी चालवायचो. 21 व्या वर्षात मी पशमीना शॉलचं साम्राज्य उभं केलं. तर माझं काम हे कपडे घालणं होतं, काढायचं नाही.'


हेही वाचा :  बॉलिवूडमध्ये होणाऱ्या भेदभाववर शहनाज गिलचं स्पष्ट वक्तव्य म्हणाली, 'मोठ्या लोकांना वेगळं आणि...'


राज कुंद्रावर बायोपिक


दरम्यान, राज कुंद्रावर बायोपिक येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. या बायोपिकमधून राज हा अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचे म्हटले जात आहे. यासगळ्यात आता राजच्या स्टॅन्डअप कॉमेडीचा व्हिडीओ सगळ्यांचे लक्ष वेधत आहे. असं म्हटलं जात आहे की राज या व्हिडीओत त्याचा मित्र मुन्नवर फारुखीसाठी कॉमेडी करताना दिसला.