Shehnaaz Gill : बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिल ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर शहनाजचे लाखो चाहते आहेत आणि फक्त सोशल मीडियावर नाही तर तिच्या खऱ्या आयुष्यात देखील तिचे लाखो चाहते आहेत. सध्या शहनाजचं चर्चेत असण्याचं कारण तिचा आगामी चित्रपट 'थँक यू फॉर कमिंग' आहे. या चित्रपटात शहनाज गिलसोबत अनेक अभिनेत्री दिसत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेली शहनाजनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चित्रपटांमध्ये काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. यावेळी बोलताना तिनं असं म्हटलं की सगळीकडे आपल्याला एकसारखी वागणूक मिळत नाही. अनेक ठिकाणी ते कोणते कलाकार आहेत त्यावरून त्यांना वागणूक दिली जाते. त्यावर तिनं डिटेलमध्ये सांगत 'थँक यू फॉर कमिंग' या चित्रपटात तिला कशी वागणूक मिळाली हे सांगितलं आहे.
शहनाज गिलच्या मनात जे असतं ते ती स्पष्ट बोलताना दिसते. तिचं हे स्पष्ट वक्तव्य 'बिग बॉस' पासून सगळ्यांना माहित आहे. आता एकता कपूरसोबत शहनाज गिल सेक्स कॉमेडी असलेल्या 'थँक यू फॉर कमिंग' या चित्रपटात दिसणार आहे. 'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत शहनाज गिलनं चित्रपट काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. तिला विचारण्यात आलं की 'तिला कशी वागणूक देण्यात आली?' यावर शहनाजनं उत्तर दिलं की 'हो, सेटवर मला खरंच असं वाटलं की मला असं वाटलं की इथे देखील मोठ्या लोकांना वेगळं दाखवलं जातं आणि छोट्या लोकांना वेगळं दाखवलं जातं. पण इथे असं काही झालं नाही.'
शहनाजनं पुढे सांगितलं की प्रोडक्शनचा यात मोठा हात आहे. त्यांनी एक टक्कासुद्धा असं वाटू दिलं नाही की 'ही मुलगी महत्त्वाच्या भूमिकेत आहे आणि तुम्ही तुझी सहाय्यक कलाकाराची भूमिका आहे. मुळीच नाही. संपूर्ण व्हॅनिटी व्हॅनमध्ये देखील चांगलं वातावरण होतं. तेव्हाच बोलवायचे जेव्हा शॉट असायचा. हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. सगळ्या गोष्टींमध्ये एकसारखी वागणूक मिळाली, त्याविषयी मी अजून काय बोलू.'
हेही वाचा : VIRAL VIDEO : केस ओढले अन्... लोकप्रिय गायकाच्या कॉन्सर्टमध्ये मुलींची फ्रीस्टाईल हाणामारी
शहनाजनं पुढे सांगितलं की प्रत्येक सेटवर असं होतं नव्हतं. मला ही गोष्ट खरंच खूप आवडली की हे सगळं मला अनुभवायला मिळालं. बॉलिवूडमध्ये चांगली माणसे नाहीत असे सगळेच लोक म्हणतीलच असं नाही. खूप छान देखील लोक आहेत. हे लोक कोण आहेत यावर अवलंबून आहे.
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.