`कास्टिंग काऊचचासाठी विचारताच सरळ मी...`, अभिनेता Rajeev Khandelwal ला मोठा खुलासा
Rajeev Khandelwal : राजीवनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याला आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाविषयी सांगितले. दरम्यान, राजीवचे लाखो चाहते असून तो नुकताच `ब्लडी डॅडी` या चित्रपटात दिसला होता.
Rajeev Khandelwal : बॉलिवूड अभिनेता राजीव खंडेलवाल नुकताच आपल्याला 'ब्लडी डॅडी' या चित्रपटात दिसला. राजीव खंडेलवाल एक उत्तम अभिनेता म्हणून ओळखला जातो. राजीवनं इतर कलाकारांप्रमाणेच करिअरच्या सुरुवातीला अनेक गोष्टींचा सामना केला आहे. राजीवनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे. यावेळी बोलताना मनोरंजन क्षेत्रात एकीकडे महिलांच्या सुरक्षिततेविषयी बोलण्यात येत, तर दुसरीकडे पुरुषांना ज्या गोष्टींचा सामना करावा लागतो त्याकडे सगळ्यांचे दुर्लक्ष होते. पुढे त्यानं सांगितलं की स्त्री आणि पुरुष यांच्यात फरक असला तरी आता परिस्थितीमध्ये बदल होत आहेत. इतकंच नाही तर राजीव त्याला आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाविषयी सांगितलं.
राजीवनं इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींविषयी मोकळेपणानं सांगितलं. सगळे स्त्रींयांच्या सुरक्षेविषयी बोलतात, पण पुरुषांच्या.. त्यांना देखील अशा अनेक परिस्थितींना सामोरे जावे लागते. फक्त पुरुष त्याविषयी तक्रार दाखल करत नाही आणि स्त्रीया करतात. मी देखील कास्टिंग काऊचचा सामना केला आहे. यावर आपल्या समाजाला असं वाटतं की काही नाही ठीक आहे, मुलगा आहे तो त्यानं मॅनेज केलं असणार."
राजीव म्हणाला, "एरवी आपण मुलांची मानसिकता वगैरेंवर बोलतो, मुलींच्या तुलनेत ते अशा गोष्टींचा सामना धाडसानं करतात म्हणतो. प्रत्यक्षात तसं नाही. अनेक मुलांनाही गप्प राहून हे सहन करावं लागतं. जेव्हा माझ्यासोबत असा प्रकार घडला, तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीला मी या पद्धतीनं काम मिळवण्यासाठी आलेलो नाही असं सांगितलं आणि त्यावेळी आलेल्या संतापात मी काही चुकीच्या गोष्टी देखी बोलून गेलो. मी या आधीही म्हणालो आहे की पुरुष यातून बाहेर पडू शकतात. मात्र, मुलींच्या मनावर खूप मोठा आघात होतो आणि त्यांना हा मानसिक त्रास खूप दिवस होत राहतो. त्यांना स्वत: ची घाण वाटते. मला नाही वाटतं मी त्या व्यक्तीला अपशब्द वापरले आणि त्याला म्हटलं की मी मला माफ कर मी तुला जे पाहिजे ते देणार नाही. स्त्री - पुरुष वेगळ्या पद्धतीनं बनले आहेत, पण आता या सगळ्या गोष्टी खूप लवकर बदलत आहेत."
हेही वाचा : "लग्न झालेलं असताना परपुरुषासोबत...," किस किंवा इंटीमेट सीन देण्यावर 'जवान' अभिनेत्रीचे मोठे वक्तव्य
'ब्लडी डॅडी' हा चित्रपट जिओ सिनेमावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता शाहिद कपूर मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफरनं केलं आहे. हा चित्रपट तुम्ही जिओ सिनेमावर मोफक पाहू शकता.