रजनीकांतला `काला`साठी इशारा
सिनेमाच्या प्रदर्शनावर सावट?
मुंबई : साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या ''काला'' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. रजनीकांतचा सिनेमा म्हटलं की एक उत्सव असतो. चाहते थलायवाच्या सिनेमाचं एकदम जल्लोषात स्वागत करतात. मात्र आगामी 'काला' या सिनेमाबाबत प्रेक्षकांची निराशा होण्याचं चित्र दिसत आहे. ''काला'' या सिनेमावर संकट उठावण्याची चिन्ह दिसत आहेत. 7 जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाला एका पत्रकाराने इशारा दिला आहे. त्यामुळे थलावयाच्या चाहत्यांना फटका बसणार का?अशी चर्चा आहे.
कोणती दिलं चॅलेंज
पत्रकार जवाहर नादर यांनी सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांच्या 'काला' टीमला चेतावणी दिली आहे. या सिनेमांत आपल्या वडिलांची नकारात्मक भूमिका दाखवण्याचा आरोप केला आहे. डेक्कन क्रॉनिकलला दिलेल्या माहितीनुसार, या सिनेमांत रजनीकांत मुंबईतील एका तामीळ गँगस्टरची भूमिका साकारत आहे. या सिनेमातील गोष्ट वास्तविक जीवनावर आधारित असल्याचं सांगितलं जात आहे.
पत्रकार जवाहर नादर यांच असं म्हणणं आहे की, 'काला' या सिनेमाची गोष्ट ही त्यांचे वडिल एस थिरावियम नदार यांच्या जीवनावर आधारित आहे. याबाबत त्यांनी कालाच्या संपूर्ण टीमला माफी मागण्यास सांगितलं आहे. असं न केल्यास सूरतमध्ये 101 करोड रुपयांचा मानहानीचा दावा करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे सुपरस्टार रजनीकांतच्या सिनेमावर काळ सावट पसरल्याचं म्हटलं जातं आहे.
रजनीकांतचं काय म्हणणं?
तर दुसऱ्या बाजूला रजनीकांत आणि कालाचे मेकर्स असं म्हणतात की, आगामी गँगस्टर ड्रामा हा थिरावियम नादर यांच्यावर आधारित नाही. त्यामुळे आता या सिनेमाचं पुढे काय होणार याची काळजी थलायवाच्या चाहत्यांना पडली आहे. रजनीकांत काला या सिनेमापाठोपाठ बिग बजेट सिनेमा 2.0 घेऊन येत आहे. प्रेक्षक या सिनेमाची देखील वाट पाहत आहेत.