Rajinikanth Jailer : दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट 10 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. रजनीकांत जवळपास दोन वर्षानंतर मोठ्या पडद्यावर आले आहेत. रजनीकांत यांचा चित्रपट येणं म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी एक सण असतो. अनेक कंपन्यांनी त्यादिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहिर केली. रजनीकांत यांचे चाहते आदल्या चित्रपटाची प्रतिक्षा करत असताना दुसरीकडे रजनीकांत स्वत: हिमालयात त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला गेल्याचे पाहायला मिळाले. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रजनीकांत यांनी हिमालयातील एका आश्रमाला भेट दिली होती. यावेळी त्यांच्या आध्यात्मावर विश्वास आणि जेलरच्या यशावर वक्तव्य केल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रजनीकांत पहिल्यांदा काही बोलले आहेत. व्हिडीओत रजनीकांत यांनी त्यांच्या आध्यात्मिक गुरुंच्या भविष्यवाणीवर असलेल्या विश्वासाबद्दल सांगितले. रजनीकांत हे ऋषिकेशमध्ये असलेल्या दयानंद स्वामी यांच्या आश्रमात गेले आहेत. तिथला हा व्हिडीओ आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत रजनीकांत हे तिथे उपस्थित असलेल्या काही मुलांशी बोलताना दिसत आहेत. जेलर हा चित्रपट लाखो प्रेक्षकांना असलेल्या अपेक्षेतून प्रदर्शित होत आहे. जेव्हा  मी दयानंद स्वामी आश्रमात पोहोचलो तेव्हा मी स्वामीजींचा आशीर्वाद घेतला आणि जेलर ही माझ्या मनात शेवटची गोष्ट होती. पण स्वामीजी म्हणाले, 'काळजी करू नको, जेलर हिट होईल.' जर स्वामीजींनी असे म्हटले आहे तर जेलर हिट आहे." रजनीकांत यांचे हे वाक्य ऐकल्यानंतर तिथे उपस्थित असलेले सगळी मुलं टाळ्या वाजवू लागले. 



रजनीकांत नुकतेच बद्रिनाथ मंदिरात दर्शनासाठी पोहोचल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. रजनीकांत यांना तिथे पाहून तिथे असलेले सगळेच त्यांचे चाहते आणि लोक खूप उत्साही झाले होते. त्यांना पाहून रजनीकांत यांनी लगेचच त्यांच्याकडे हात हलवत मी तुमच्यासोबत आहे असे दर्शवले. 



हेही वाचा : खुशी कपूर नव्हे, तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय AP Dhillon? लिपलॉकचा व्हिडीओ VIRAL


दरम्यान, रजनीकांत यांच्या या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर चित्रपटानं 4 दिवसात तब्बल 300 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे नेल्सन दिलीप कुमार यांनी केले आहे. रजनीकांत यांच्याशिवाय या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ, तमन्ना भाटिया, शिव राजकुमार, प्रियांका मोहन, राम्या कृष्णन, योगी बाबू, वसंत रवि, विनायकन दिसत आहेत. तर मल्याळम अभिनेता मोहनलाल हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसत आहेत.