वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी रजनीकांत यांच्या अल्पवयीन नातवाला ट्रॅफिक पोलिसांचा दणका
Rajinikanth`s grandson : रजनीकांत यांचा नातू अल्पवयीनं नातवाला ट्रॅफिक पोलिसांचा दणका, आकारला इतका दंड
Rajinikanth's grandson : दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत यांचा नातू आणि धनुषचा मोठा मुलगा यात्रा राजाला ट्रॅफिक पोलिसांनी दंड आकारला आहे. यात्रा हा आता 17 वर्षांचा आहे. तर अल्पवयीनं असताना तो गाडी चालवत होता आणि त्यातही त्यानं ट्रॅफिकचे नियम मोडले आहेत. यासोबत त्यानं हेलमेट परिधान केलं नव्हतं किंवा त्याच्याकडे लायसन्स देखील नव्हतं. कोणतेही कागदपत्रे नसताना तो सुपरबाईक चालवत असल्याचे त्याला आरोप मिळाला आहे. त्याला चेन्नईच्या पोएस गार्डन परिसरात सुपरबाइक चालवताना पोलिसांनी पकडलं. त्याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत यात्रा राजाला एक गाइड ट्रेनरच्या मदतीनं रस्त्यावर फिरताना पाहिले. त्यावरून असं वाटतंय की तो बाईक चालवणं शिकत आहे. खरंतर, व्हिडीओ समोर आल्यानंतर ज्या गोष्टीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं, ते म्हणजे त्यानं न हेलमेट परिधान केलं आणि नाही त्याच्या बाईकवर असलेली नंबर प्लेट स्पष्ट दिसत होती. दरम्यान, असे म्हटले जातं की जेव्हा अधिकाऱ्यांनी धनूष आणि त्यांच्या मुलाशी संपर्क साधला तेव्हा लक्षात आलं की यात्रा राजाकडे ड्रायव्हिंग लायसेंस देखील नव्हतं. व्हिडीओत नक्की तोच यात्रा राजा आहे की नाही हे तपासण्यासाठी पोलिसांनी त्याची आई ऐश्वर्या रजनीकांतशी संपर्क साधला.
रिपोर्ट्सनुसार, नियमाचे उल्लंघन केल्यानं ट्रॅफिक पोलिसांनी यात्रा राजाला 1 हजार रुपये दंड म्हणून आकारला आहे. पोलिसांनी या नियमाचे उल्लंघन आणि दंड आकरण्यावर वक्तव्य केलं की हा दंड आकारल्यानं ही गोष्ट स्पष्ट झाली की नियम हे सगळ्यांना सारखेच आहेत. मग ती व्यक्ती कोणत्याही कुटुंबातून असो. चेन्नई ट्रॅफिक पोलिसांनी यात्रा राजाकडून दंड आकरल्यानं सोशल मीडियावर त्यांच्या कामाची चर्चा सुरु असून सगळे त्यांची स्तुती करत आहेत.
हेही वाचा : तुषार कपूरनं का नाही केलं लग्न? सरोगसीच्या मदतीनं वडील होण्या मागचं कारण समोर
धनूष आणि ऐश्वर्याविषयी बोलायचे झाले तर गेल्या वर्षी ते दोघं विभक्त झालं. यात्रा राजा आणि त्याचा लहाण भाऊ लिंगा या दोघांचा सांभाळ ऐश्वर्या आणि धनूष मिळून करत आहेत. 18 नोव्हेंबर मध्ये धनुष आणि ऐश्वर्याचं लग्न झालं. तर 2006 मध्ये मुलगा यात्रा राजाचा जन्म झाला. त्यानंतर 2010 मध्ये लिंगाचा जन्म झाला. धनुष हा शिव भक्त असल्यानं त्यानं त्याच्या दोन्ही मुलांची नावं ही महादेवाशी संबंधीत ठेवली आहे.