मुंबई : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान सध्या त्याच्या 'दबंग ३' चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा त्याच्या पत्नीची भूमिका बजावताना दिसणार आहे. तर चुलबूल पांडेच्या पत्नी करवा चौथच्या मुहुर्तावर सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये चंद्राची पूजा करताना दिसत आहे. रज्जोचं चुलबूल पांडेवरचं प्रेम सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटात सोनाक्षी सिन्हा शिवाय अभिनेत्री सई मांजरेकर देखील झळकणार आहे. चूलबूल पांडेच्या भूमिकेत झळकणाऱ्या सलमानच्या तरूणपणाच्या प्रेयसीच्या भूमिकेत सई दिसणार आहे. चप्रमाणे अभिनेता विनोद खन्ना यांच्या मृत्यूनंतर प्रजापती पांडे यांची भूमिका प्रमोद खन्ना साकारणार आहे.   


'भारत' चित्रपटाच्या दमदार यशानंतर सलमानची पाऊले 'दबंग ३'च्या चित्रपटाच्या चित्रीकरणाकडे वळली आहेत. दिग्दर्शनाची जबाबदारी प्रभूदेवा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. 'दबंग-३' चित्रपट २० डिसेंबर २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.