Mr And Mrs Mahi Trailer Released : गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही आयपीएल मॅच पाहण्यासाठी एक जर्सी परिधान करून गेली होती. ती जर्सी खरंतर ती कोणत्याही खेळाडूला पाठिंबा देण्यासाठी नाही तर तिच्या आगामी चित्रपटाची एक हिंट होती. त्या चित्रपटाचं नाव आहे 'मिस्टर अँड मिसेस माही'. या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला आयपीएल सामन्यादरम्यान लाँच करण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2 मिनिटं 55 सेकंदाच्या या ट्रेलरनं सगळ्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि जान्हवी कपूर हे दोघेही त्यांची स्वप्न आणि त्यांची कर्तव्य यात कसे गुंतलेले असताता ते पाहायला मिळालं आहे. पत्नीला क्रिकेटर बनवण्यासाठी मिस्टर माही त्याच्या कुटुंबाच्या कसा विरोधात जातो हे दाखवलं आहे. तर राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांची अतिशय गोड मैत्री दाखवली आहे. राजकुमार राव आणि जान्हवीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


'मिस्टर आणि मिसेस माही' हा चित्रपट नक्कीच कमालीचा असणार आहे असं ट्रेलर मधून बघायला मिळतंय. सर्वात पॉवरपॅक परफॉर्मर राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांचा हा दुसरा प्रोजेक्ट आहे. दोघांनी यापूर्वी 'रुही'मध्ये स्क्रीन शेअर केली होती. निर्माता करण जोहरनं या चित्रपटाचे वर्णन करताना एक पोस्ट शेअर केली आहे. यात करणनं चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत म्हटले की "काही चित्रपट केवळ कथांपेक्षा जास्त असतात … ते सेल्युलॉइड प्रेमापेक्षा बरेच काही असतात… ते दर्शकांशी बोलतात. स्वप्ने आणि किती वेळा आपल्या जवळचे लोक आपल्या स्वप्नांच्या मार्गात येऊ शकतात." 


हेही वाचा : 'पुष्पा 2: द रुल' ते 'सिंघम अगेन '2024 मध्ये प्रदर्शित होणार 'हे' खास प्रोजेक्ट्स


राजकुमार रावच्या कामाविषयी बोलायचं झालं तर त्याचा 'श्रीकांत' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. तो 'मिस्टर आणि मिसेस माही' या चित्रपटाशिवाय  'स्त्री 2' मध्ये दिसणार आहे. शरण शर्मा दिग्दर्शित, 'मिस्टर आणि मिसेस माही' हा चित्रपट 31 मे रोजी रिलीज होणार आहे. शरण शर्मा आणइ जान्हवी कपूर या दोघांनी 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' या चित्रपटासाठी एकत्र काम केलं होतं. त्याशिवाय शरणनं या चित्रपटातूनच दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे.