Rajkumar Rao : आपण लहाण असतो तेव्हाच मोठं होऊंन कोणत्या क्षेत्रात आपलं करिअर करायचं हे ठरवत असतो. अनेकदा आपण कधी काय तर कधी काय विचार करतो. अनेकदा लहाणपणी मुलांना पायलेट व्हायचं असतं, कधी कोणाला शिक्षक व्हायचं असतं. तर कधी कोणाला अभिनेता व्हायचं असतं. पण जसे आपण मोठे होतो तसं आपल्याला कळू लागतं की आपण कशात करिअर करायला हवं. त्यात कॉलेजल्या गेल्यानंतर आपण एक निर्णय घेत एक ठरावीक क्षेत्र निवडतो. असाच एक अभिनेता होता ज्यानं 11 वी असताना अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा अभिनेता म्हणजे राजकुमार राव. आज त्याचा 39 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया... राजकुमार रावचा जन्म गुडगांवमध्ये झाला होता. त्याला लहाणपणापासून अभिनेता बनायचे होते. त्यानं त्याचं हे स्वप्न कोणतंही फिल्मी बॅकग्राऊंड नसताना पूर्ण केलं. एका मुलाखतीत राजकुमार रावनं त्याच्या या निर्णयाविषयी आणि कॉलेजमध्ये असतानाचा एक किस्सा सांगितला आहे. कॉलेजमधील हा किस्सा सांगत असताना राजकुमार राव म्हणाला, 'तेव्हा मी गुडगांवच्या ब्लू बेल्स या शाळेत होतो. 11 वीत असताना मला एक मुलगी खूप आवडू लागली. मला तिच्यावर प्रेम झाले होते. ही मुलगी शाहरुख खानच्या 'कुछ कुछ होता है' या चित्रपटातील अंजली सारखी दिसायची. ती अंजली प्रमाणे बास्केट बॉल खेळायची. तिच्यासारखेच कपडे परिधान करायची. मी आधी पासूनच शाहरुखचा चाहता होता. तेव्हा मला वाटलं की मला माझी अंजली भेटली. कसं तरी तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आलो. पण तिचा आधीच अमन नावाचा एक बॉयफ्रेंड होता.' 



राजकुमार रावनं याविषयी आणखी माहिती देत सांगितले की, जेव्हा त्या मुलीच्या बॉयफ्रेंडला कळले की ती माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तर मला मारण्यासाठी तो मुलांची एक टोळी घेऊन आला. कॉलेजमधले एक-दोन नाही तर तब्बल 25 मुलं घेऊन तो आला होता. त्यावेळी, मी खूप साधा-भोळा मुलगा होतो. मी त्यावेळी ठरवलं होतं की मला भांडायचं नाही, कारण मला तर अभिनेता बनायचे आहे. जेव्हा ती 25 मुलं त्या मुलीमुळे मला मारत होते, तेव्हा ते एकमेकांशी बोलत होते की बंदूक काढा, गोळी मारा. मी गप्प बसून राहिलो. माझ्यासोबत दोन पंजाबी मित्र होते, ते ओरडत होते की त्याला मारू नका, पाहिजे तर आम्हाला मारा. ते जेव्हा मला मारत होते तेव्हा मी एकच गोष्ट सतत बोलत होतो आणि ती म्हणजे माझ्या चेहऱ्यावर मारू नका. मला अभिनेता बनायचे आहे. माझं हे शब्द ऐकूण तिथे उपस्थित असलेले सगळे मोठ्या-मोठ्यानं हसू लागले. हा किस्सा खरंच घडला होता.'


हेही वाचा : Jawan Trailer : अरे नेमकं चाललंय काय? शाहरुखच्या 'जवान'चा ट्रेलर पाहून व्हाल Confused


स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजकुमार रावनं खूप मेहनत घेतली. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लव सेक्स और धोखा' या चित्रपटातून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. गॅंग्स ऑफ वासेपुर' पार्ट 2, 'शाहिद', 'सिटीलाइट्स', 'अलीगढ़', 'ट्रॅप्ड', 'न्यूटन', 'ओमेर्ता' आणि 'स्त्री' सारखे अनेक दर्जेदार चित्रपट दिले. याशिवाय तो प्रियांका चोप्रासोबत 'द व्हाइट टाइगर' आणि जान्हवी कपूरसोबत 'रूही' या चित्रपटात दिसला होता.