जावई लाखामोलाचा.... रजनीकांत यांच्याकडून कौतुक; तरीही घटस्फोट?
मुलीचा घटस्फोट याहून बापासाठी मोठं दुःख नसेल
मुंबई : साऊथमधील लोकप्रिय जोडी धनुष (Dhanush)आणि ऐश्वर्या रजनीकांत (Aishwarya Rajinikanth)यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. धनुषने पत्नी ऐश्वर्यासोबतचा १८ वर्षांचा संसार मोडला आहे. सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय जाहीर केली. चाहत्यांना यांचं वेगळं होण्याने खूप दुःख झालं आहे.
ऐश्वर्या ही तमिळ स्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी आहे. तसेच ती स्वतः सिनेमा निर्माती आहे. आता चाहते सोशल मीडियावर रजनीकांत यांचा एक जुना व्हिडीओ शेअर करत आहेत. ज्यामध्ये रजनीकांत जावई धनुष यांच कौतुक करताना दिसत आहेत. (धनुष- ऐश्वर्याचा घटस्फोट म्हणजे....; अभिनेत्याच्या वडिलांकडून धक्कादायक खुलासा)
'काला' सिनेमाच्या म्युझिक लाँचच्यावेळी रजनीकांत यांनी धनुषचं खूप कौतुक केलं होतं. धनुष हा उत्तम बाप होण्यासोबतच चांगला जावई देखील आहे. असं म्हटलं होतं. २०१८ सालचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
'रांझणा'च्या रिलीजच्या वेळी धनुषने रजनीकांत यांना कसे प्रभावित करायचे हे सांगितले होते. ते म्हणाले होते की, रजनीकांत सरांचे मन वळवणे खूप सोपे आहे. त्यांच्यासमोर फक्त एक चांगली व्यक्ती व्हा आणि ते तुम्हाला पसंत करतील. चांगली गोष्ट म्हणजे त्यांना माझे काम आणि चित्रपट आवडतात. धनुष आणि ऐश्वर्याने 2004 मध्ये लग्न केले होते. त्यांना यात्रा आणि लिंग अशी दोन मुले आहेत. आता लग्नाच्या 18 वर्षानंतर दोघेही वेगळे होत आहेत.
रजनीकांत यांच्याकडून धनुषचं कौतुक
रजनीकांत व्हिडिओमध्ये म्हणतात की, धनुष खूप चांगला मुलगा आहे. तो आपल्या पालकांचा आदर करतो, त्यांना देव मानतो. तो आपल्या पत्नीची काळजी घेतो. तो खूप चांगला पिता आहे, एक चांगला जावई आहे, एक चांगला माणूस आहे आणि एक उत्कृष्ट प्रतिभा धनुषमध्ये आहे.