नवी दिल्ली : एका प्रकरणात कर्जफेड न केल्याने तुरुंगवासाची शिक्षा झालेला अभिनेता राजपाल यादवची फेब्रुवारी महिन्यात सुटका झाली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आता पुन्हा चित्रपटांतून कमबॅक करणास आणि चित्रपटाचं शूटिंग करण्यासाठी उत्साही असल्याचं राजपाल यादवने म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मी लवकरच 'टाईम टू डान्स' या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. चित्रपटाचं शूटिंग परदेशात झालं आहे. आता चित्रपटाच्या शूटिंगचा काही भाग बाकी असून ते लवकरच पूर्ण करणार आहे. चित्रपटाचं शूटिंग आधीच पूर्ण झालं असतं परंतु मी निर्माता आणि दिग्दर्शकांचे आभार मानतो की त्यांनी मी परत येईपर्यंत माझी वाट पाहिली' असल्याचं राजपाल यादवने म्हटलंय. 


'जाको राखे साइयां' चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण होणार आहे. डेविड धवन आणि प्रियदर्शनसह बोलणी सुरू असून मी पुन्हा चित्रपटाच्या सेटवर येण्यासाठी उत्साही असल्याचं राजपालने म्हटलं आहे. 


'मला वाटतं कायदा सर्वांसाठी सारखा आहे. देशातील कायद्यापासून कोणीही वाचू शकत नाही म्हणूनच मी कायद्याच्या आदेशाचं पालन केलं. मी काही लोकांवर विश्वास ठेवला आणि त्यांनी माझा चुकीचा फायदा घेतला. परंतु मी यावर अधिक काही बोलू इच्छित नाही. मला केवळ पुढे जायचे असल्याचे' राजपाल यादवने म्हटलंय. 



२०१० रोजी चित्रपट बनवण्यासाठी एका कंपनीकडून पाच करोड रूपये कर्ज घेतलं होतं. ते कर्ज न फेडल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०१८ मध्ये राजपाल यादवला तीन महिन्यांची शिक्षा सुनावली होती.